AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यातील 5 शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा, मतदान अन् मतमोजणी कधी?

राज्यातील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

मोठी बातमी! राज्यातील 5 शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा, मतदान अन् मतमोजणी कधी?
Election Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 11:30 AM
Share

राज्यातील 5 शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट आली आहे. निवडणूक आयोगाने राज्याील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर याची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

राज्यात आता निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. विधानपरिषदेतील रिक्त होणार्‍या जागांवर निवडणुका होणार आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया ही 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ५ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आल्याने सर्व राजकीय पक्ष आता जोरदारपणे कामाला लागण्याची शक्यता आहे.

5 जागांवर होणार निवडणूक?

केंद्रीय आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये विधानपरिषदेच्या 8 जागा रिक्त होणार आहेत. यात 4 शिक्षक आणि 4 पदवीधर मतदारसंघाच्या जागा आहेत. कर्नाटकात 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक होईल. तर महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त होत आहेत. यात 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेशातही 11 विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक होईल. त्यात 5 पदवीधर आणि 6 शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून कोणत्या जागा रिक्त होणार?

महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतिश चव्हाण, पुणे पदवीधार मतदारसंघात अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक, पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे प्रतिनिधित्व करत होते. या पाचही आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी लवकरच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकच धावाधाव पाहायला मिळेल. त्यामुळे कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Follow Us
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत