AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Updates : सावधान ! राज्यात पुढले काही दिवस धोक्याचे, गारपीट आणि वादळी पाऊस, या भागात ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक वैतागले असतानाच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसाचं सावटही कमी होताना दिसत नाही. पुढले काही दिवस अत्यंत धोक्याचे असून वादळी वारा, गारपीटीचा इशारा आहे.

Maharashtra Weather Updates : सावधान ! राज्यात पुढले काही दिवस धोक्याचे, गारपीट आणि वादळी पाऊस, या भागात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच मोठा इशाराImage Credit source: google
| Updated on: Mar 30, 2026 | 8:19 AM
Share

मार्च महिना संपून आता एप्रिलला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश बागात उन्हाचा तडाखा बसू लागला असून गरमी, वाढतं ऊन, तापमान यामुळे राज्यातील नागिरक त्रस्त झाले आहेत. मात्र असं असलं तरी अवकाळी पावसाचं सावटही राज्यभरावर घोंगावत असून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गारपीट, पाऊस झाला आहे. पावसाने मध्यंतरी विश्रांती घेतली होती, मात्र आता राज्यात पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस राज्यासाठी कठीण असून, राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारा, पाऊस आणि तुरळक गारपीट होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून, फळांचा राजा असलेल्या आंब्याचं पीकही संकटात सापडण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्याचा मोहोर गळू शकतो आणि पीक, उत्पाहन कमी होऊ शकतं.

मार्च महिन्यात काही ठिकाणी झासलेल्या पावसामुळे आधीचं पिकांचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झालं आहे, आता महिनाअखेरीस देखील पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. एकीकडे ऊन, एकीकडे पाऊस यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी असेल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या मिलाफामुळे ही स्थिती निर्माण झाली असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या वरच्या स्तरात पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत.

आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किमी अतंरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहत आहे. हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे.

तसेच आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहेत. सोसाट्याचा वारा वाहू शकतो, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर राहील. बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळतील, ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या या भागात ऑरेंज अलर्ट

पाऊस आणि गारपिटीसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर. मंगळवार – जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे ऑरेंज अलर्ट आहे. तसेच आज आणि उद्या गारपिटीचा धोका जास्त आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.