AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Israel-Iran War : एकीकडे शांततेचा प्रस्ताव, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलकडून रात्रभर बॉम्बवर्षाव, 31 व्या दिवशीही युद्ध…

US Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यामुळे सुरू झालेल्या युद्धाला आता 31 दिवस झाले आहेत. या युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झालेला दिसत आहे. एकीकडे पाकिस्तानकडून आसा दावा करण्यात आला आहे की, दोन्ही देश वाटाघाटी करण्यास सहमत झाले आहेत. तर दुसरीकडे, अमेरिका खार्ग बेट आणि इराणचे तेल जप्त करू शकतं, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

US-Israel-Iran War : एकीकडे शांततेचा प्रस्ताव, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलकडून रात्रभर बॉम्बवर्षाव, 31 व्या दिवशीही युद्ध...
| Updated on: Mar 30, 2026 | 8:06 AM
Share

इराणवर अमेरिका-इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यानंतर गेल्या 31 दिवसांपासून, म्हणजेच जवळपास महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. तीन देशांतील या युद्धाचा फक्त त्यांनाच नव्हे तर जगलाही मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे होमुर्जची समुद्रधुनी बंद असल्याने अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झालं आहे. मोठी जीवितहानी, नुकसान होत असूनही तिन्ही देशांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नाही. सध्या या देशांमध्ये चर्चेचा, शांततेचा प्रस्ताव असला तरीही दुसरीकडून हल्लेही होतच आहेत. युद्धविरामासाठी अमेरिका आणि इराणने एकमेकांसमोर कठोर अटी ठेवल्या आहेत.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दोन्ही देश चर्चेसाठी तयार असल्याचा दाव केला आहे.   पाकिस्तान दोन्ही देशांमधील चर्चेसाठी मध्यस्थी करणार असल्याचंही ते म्हणाले.  “या प्रदेशातील युद्धाचा जलद आणि कायमस्वरूपी अंत करण्याच्या संभाव्य मार्गांवर आम्ही चर्चा केली. हे युद्ध कोणाच्याही फायद्याचे नाही आणि त्यामुळे केवळ मृत्यू आणि विनाशच होईल, यावर आमचे एकमत झाले. या आव्हानात्मक काळात एकता अत्यावश्यक आहे” असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री म्हणाले.  मात्र, एकीकडे, पाकिस्तानने, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेसाठी मध्यस्थी करत असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, तेहरानमध्ये हल्ले सुरूच असून, पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांनंतर काही भागांतील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

पेट्रोकेमिकल प्लांट निशाण्यावर

युद्धस्थिती कायम असून इराणच्या उत्तर भागातील पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ला करण्यात आला. इराणच्या उत्तरेकडील प्रांतातील तब्रीझ पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ला झाल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी सोमवारी पहाटे दिले. या हल्ल्यात कोणत्याही धोकादायक पदार्थांची गळती झाली नसल्याचही त्यांनी नमूद केलं. ही कंपनी तेल किंवा नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करून अशी रासायनिक उत्पादने तयार करते, ज्यांचा उपयोग प्लास्टिक आणि इतर रसायनांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये होतो.

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलने वायव्य इराणमधील तब्रीझ शहरातील एका पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर प्रकल्पातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे, माध्यमांनी वृत्ता नमूद केलं आहे.

खार्ग बेटाबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा

दरम्यान अमेरेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाची खुमखुमी अजूनही कमी झालेली दिसत नाही. अमेरिका इराणचं तेल जप्त करू शकते आणि एक प्रमुख निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावरही ताबा मिळवू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

ॲल्युमिनियम प्लांट्सवर हल्ला

इराणचं सरकारी माध्यम, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) नुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) शनिवारी एक निवेदन जारी करून, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनमधील ॲल्युमिनियम प्रकल्पांसह या प्रदेशातील प्रमुख औद्योगिक सुविधांना लक्ष्य केल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे.

त्यांची एरोस्पेस आणि नौदल दलांनी क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचा वापर करून एक संयुक्त कारवाई केली, ज्यामध्ये अमेरिकेच्या लष्करी आणि एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित असलेल्या उद्योगांना लक्ष्य करण्यात आलं, असं आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम (EMAL) सुविधा आणि बहरीनमधील ॲल्युमिनियम बहरीन (ALBA) यांचा या टार्गेटमध्ये समावेश होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.