AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पुढच्या 48 तासांमध्ये ते पश्चिम ते दिशेने पुढे सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा
| Edited By: | Updated on: Oct 19, 2020 | 7:49 AM
Share

नवी दिल्ली : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे देशातील अनेक भागांत आज हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनाऱ्यापासून दूर जात आहे, यामुळे पश्चिमी किनाऱ्यालगत याचा काहीही परिणाम दिसणार नाही. पुढच्या 48 तासांमध्ये ते पश्चिम ते दिशेने पुढे सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)

यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. यामुळे आंध्र प्रदेश, यानम आणि रायलिसमा इथं पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासांमध्ये गुजरात, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा आणि अंदामान व निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण आणि दक्षिणपूर्व राजस्थान आणि तामिळनाडू या भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, केरळ आणि दक्षिण मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे.

तेलंगाना-हैदराबादमध्ये परिस्थिती गंभीर तेलंगाना आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये रविवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हैदराबादमध्ये. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. तर कर्नाटकमध्येही काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. या अस्मानी संकटामुळे तब्बल 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या –

रायफलमधून चुकून झाली फायरिंग, मुंबईत शिपायाचा जागीच मृत्यू
तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

(Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.