AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण या सगळ्यातून आजचं हवामान दिलासादायक आहे.

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे भीषण परिणाम दिसले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा दुखी झाले आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण या सगळ्यातून आजचं हवामान दिलासादायक आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. (maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

सांगलीत झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अहमदनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. खरंतर, हवामान खात्याने आधीच अशा पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण आज 20 फेब्रुवारीला हवामान सामान्य आहे. आज राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कालच्या पावसाच्या थैमानानंतर वातावरण कोरडं आहे.

राज्यात कुठे कसं आहे हवामान?

उत्तर कोकण – उत्तर कोकणामध्ये 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा – इथं गेल्या दोन दिवसापासून वातवरण आयलेटेड आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान आयसोलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र – 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

मराठवाडा – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

पूर्व विदर्भ – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

पश्चिम विदर्भ – पश्चिम विदर्भात 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पूर्व भारतातील राज्यांमध्ये आतापर्यंत कधीही पाऊस झाला नव्हता. परंतु त्या राज्यांमध्ये सध्या पावसाचे ढग दाटून आलेत. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. 1 जानेवारी ते 17 फेब्रुवारीच्या कालावधीत झालेल्या पावसाचा सरासरी विचार केल्यास बिहारमध्ये 97 %, झारखंडमध्ये 92 % पाऊस कमी पडलाय, तर पश्चिम बंगालमध्ये 91 टक्के कमी पाऊस पडलाय. त्याशिवाय ईशान्य राज्यांतील जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाला आहे.

विदर्भ आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळाची स्थिती

हवामानातील या बदलांची कारणे लक्षात घेतल्यास विदर्भ आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळाची स्थिती होती आणि दक्षिणेकडील द्विपकल्पपर्यंत हे वारे वाहत होते. ओडिशामध्ये एक चक्रीवादळ सक्रिय असल्याची प्राथमिक माहितीही समोर आली होती. या चक्रीवादळांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला होता.

20 फेब्रुवारीपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

18 फेब्रुवारीनंतर पावसाचे ढग कमी होतील आणि 19 ते 20 फेब्रुवारीपासून हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. महाराष्ट्रासह, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात वेगाने जोरदार पाऊस, गडगडाटी वीज व वारा यांसारख्या घटना एप्रिलपासून सुरू होतात. एप्रिल ते जून या काळात कधी कधी हवामान बिघडलेले असते. (maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

संबंधित बातम्या – 

मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली

राज्य दूध उत्पादक संघानंतर सहकारी संघाचाही शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ

Mumbai Corona update | मुंबईला कोरोनाचा विळखा, 823 नवे रुग्ण; चेंबूरमधील 4 इमारती सील

(maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.