रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारी ती व्यक्ती कोण? रुपाली चाकणकरांनी दिली संपूर्ण माहिती

पुण्यातील स्वारगेट आणि मुक्ताईनगर येथील महिला छेडछाडीच्या घटनांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनांना तीव्र शब्दांत निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारी ती व्यक्ती कोण? रुपाली चाकणकरांनी दिली संपूर्ण माहिती
rupali chakankar raksha khadse
| Updated on: Mar 02, 2025 | 3:25 PM

सध्या महाराष्ट्रातील महिला आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर महिलेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान छेड काढण्यात आली. या घटनेनंतर मंत्र्‍यांच्या मुली सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मुलींचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. “ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत, यांचे चेहरे आता समोर आणले पाहिजे”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

त्या टवाळखोरांवर गुन्हा दाखल

“केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला. त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या टवाळखोराला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. बऱ्याच गोष्टी समोर येतील. यात जो दोषी आढळला जाईल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्या टवाळखोरांनी व्हिडीओ काढला. गार्डने त्यांना खाली आणल्यानंतर हटकले होते. यापूर्वी त्या टवाळखोरांवर गुन्हा दाखल आहेत. ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत. यांचे चेहरे आता समोर आणले पाहिजेत. काळे कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे. ही विकृती कमी झाली पाहिजे”, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

तेव्हा याप्रकरणी अधिक बोलले जाईल

“मुख्यमंत्री, आयोग, पोलिस नक्की दखल घेतील. मिडिया ट्रायल न करता पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे. स्वारगेट प्रकरणी आरोपी १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहे. जे पुरावे समोर येतील तेव्हा याप्रकरणी अधिक बोलले जाईल”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

अन्यथा आम्ही कडक कारवाई केली असती

“राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे. कोण काय बोलत असेल, तर तो प्रश्न तुम्हीच त्यांना विचारा. अशा बाप असलेल्या व्यक्तींना चिरडून काढले पाहिजे पण आपण न्यायाच्या चौकटीत आहोत. कायद्यामुळे हात बांधले जातात अन्यथा आम्ही कडक कारवाई केली असती”, असेही रुपाली चाकणकरांनी म्हटले.