AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाची बातमी ! जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय होणार निर्णय?

राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. 50 % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला 15 जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 17 जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील.

महत्त्वाची बातमी ! जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय होणार निर्णय?
निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 03, 2025 | 12:41 PM
Share

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. 20 डिसेंबर रोजी उरलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच आता राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या जोरदार हालचाली निवडणूक आयोगात सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्यास सर्व पक्षीय नेत्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळू शकणार आहे. त्यामुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी कोर्टाने या पुढच्या कोणत्याही निवडणुकीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याचं नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. ज्या ठिकाणी 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे त्या 17 जिल्हा परिषदा सोडून इतर 15 जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहे.

कोणताही अडसर नसेल तर…

महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठलाही अडसर नसल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नसल्याने महापालिका निवडणुका सुद्धा नगरपालिका नगर पंचायती निवडणुकीनंतर घेण्यासंदर्भात हालचाली राज्य निवडणूक आयोग करत आहे. ज्या मतदार संघांतील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, त्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते.

निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकत नाही

जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. तर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारी रोजी होणार असल्याने निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा अडसर नाही त्या ठिकाणी निवडणुका देण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर