AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा”, नितेश राणेंचा अजब फतवा

नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी आमदार असताना मला खूप त्रास दिला गेला. "विरोधी आमदार असताना निधी देण्यावरून सुद्धा मला डावललं गेलं", असे नितेश राणे म्हणाले. 

निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा, नितेश राणेंचा अजब फतवा
nitesh rane
| Updated on: Feb 13, 2025 | 3:53 PM
Share

“भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यांमध्ये ताकदीने वाढला पाहिजे. येत्या निवडणुकांमध्ये महायुती सोडून अन्य कोणीही सत्तेत येणार नाही असे काम करा. या जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप निर्माण करा” असे आवाहन मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी नितेश राणे यांनी एक फतवाही सोडला.

कुडाळ तालुक्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी आमदार असताना मला खूप त्रास दिला गेला. “विरोधी आमदार असताना निधी देण्यावरून सुद्धा मला डावललं गेलं”, असे नितेश राणे म्हणाले.

महायुतीबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

“भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष असला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची असली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नको. महायुतीबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, मात्र विरोधकांना दूर ठेवणारा विकास हवा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा”, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

मविआ सरपंचाला एकही रुपयाचा निधी मिळणार नाही

“तुम्हालाही न्याय देऊ आणि गावातील विकासाला साथ देऊ. जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल, असा विधानही नितेश राणेंनी केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला जाणार आहे. महाविकासआघाडीचा सरपंच असेल तर त्याला एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही. भाजपमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा”, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केले.

गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा

“येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजनचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा”, असा फतवा कुडाळचे आमदार नितेश राणे यांनी काढला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...