AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पुन्हा रक्तरंजित थरार; माहिम रेल्वे स्टेशनबाहेर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Mumbai mahim crime news : मुंबईच्या माहिम रेल्वे स्टेशनबाहेर ३५ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मुंबईत पुन्हा रक्तरंजित थरार; माहिम रेल्वे स्टेशनबाहेर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
| Updated on: Jun 28, 2026 | 10:37 AM
Share

मुंबईत पुन्हा रक्तरंजित थरार घडला आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिम स्टेशनबाहेर किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून ३५ वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखाराने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवीन हा माहिम पश्चिम भागात असलेल्या पितांबर लेन भागात राहायला आहे. नवीन हा गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लोअर परळ येथील ऑफिसमधून काम आटोपून घरी परतत होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने नवीनवर जीवघेणा हल्ला केला.

नेमकं काय घडलं?

माहिम स्टेशनबाहेर जात असताना नवीनचा अज्ञात व्यक्तीला धक्का लागला. त्यानंतर अज्ञात हल्लेखोराने मोबाइल खाली पडून तुटल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने नवीनकडे नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु नवीनने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून हल्लेखोराने नवीनवर चाकू काढून वार केले. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीच्या हल्ल्यात नवीनच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यात नवीन रस्त्यावर कोसळला. आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवीनला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नवीनचे भाऊ सचिन यांनी सांगितलं की, नवीन हा लोअर परळ भागातील जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम कार्यरत आहे. जीवघेण्या हल्ल्यानंतर नवीन जवळपास 15 तास बेशुद्ध होता.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.  हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे मार्गाने घटनास्थळावरून फरार झाल्याचे संशय व्यक्त करण्यात आलाय. आरोपी हा अंमली पदार्थांचा व्यसनाधीन असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या चिंता पुन्हा वाढली आहे.

सॉरी म्हटल्यानंतरही चाकू हल्ला

माहिम रेल्वे स्टेशन परिसरात चालताना धक्का लागल्यानंतर नवीनने सॉरी म्हटल्यनंतरही आरोपीने नवीनवर चाकू हल्ला केला. धक्का लागल्याने मोबाइल खाली पडल्याचा कांगावा करत आरोपीने हल्ला केला. अज्ञात हल्लेखोराने तरुणावर चाकूने वार केल्याने नवीन रक्तबंबाळ झाला. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या नवीनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ जून रोजी घडलेल्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट