AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 जूनला राज्यात धो धो पाऊस, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन, एल निनोचा..

Monsoon update : राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पेरण्या रखडल्या आहेत. त्यामध्येच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन करण्यात आले. 15 जूनला राज्यात पूर्णपणे मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

15 जूनला राज्यात धो धो पाऊस, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन, एल निनोचा..
Monsoon update
| Updated on: Jun 13, 2026 | 7:17 AM
Share

एल निनोचा मोठा इशारा महाराष्ट्रात देण्यात आला. एल निनोमुळे यंदा राज्यात पाऊस कमी सांगितला आहे. 13 जून  उजाडला आहे. मात्र, पाऊस काही अद्यापही येण्याचे नाव घेत नाही. पूर्ण राज्यात मॉन्सून दाखल होण्यास उशिर होत आहे. पेरण्या रखडल्या आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की, जोपर्यंत कृषी विभागाकडून सांगितले जाणार नाही, तोपर्यंत पेरण्या करू नका. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट राहणार नाही. मात्र, कृषी विभागाच्या आवाहनानंतरही अनेक शेतकरी पेरण्या करत आहेत. 15 जूननंतरच राज्यात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. उष्णता वाढताना दिसत आहे. हवामान तज्ज्ञांकडून वेगवेगळे अंदाज दिले जात आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसारही, राज्यात 15 जून 2026 नंतर पावसाची शक्यता आहे. हा मोठा अंदाज वर्तवण्यात आला.

काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. 15 जूनची सर्वजण वाट बघत आहेत. एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर दिसतोय. काही भागात असूनही अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला. विदर्भात पाऊस हजेरी लावताना दिसत असतानाच आता उष्णतेचा मोठा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे असेल. यंदा विदर्भात म्हणावा तसा पाऊस होणार नसल्याचा अंदाज अगोदरच देण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगड आणि अकोला जिल्ह्यात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज आहे. ऐन जून महिन्यात राज्यातील अनेक भागात उष्णता वाढताना दिसत आहे.

हवामान विभागाने देशभरातील काही राज्यात पाऊस आणि वादळाबाबत नवीन इशारा जारी केला आहे. 13 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. काही राज्यात पाऊस तूफान कोसळत आहे. पण महाराष्ट्रात ठणठण गोपाळा आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर