AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉर्फ फोटोतील ती तरुणी गिरीश महाजन यांच्या मित्राची मुलगी, अखेर तक्रार पोलिसांकडून..

मंत्री गिरीश महाजन यांचा एक तरुणीसोबतचा फोटो व्हायरल झाला. या व्हायरल फोटोने मोठी खळबळ उडाली. गिरीश महाजन यांच्यासोबत दिसणारी ती तरुणी नक्की कोण याबाबत खुलासा झाला. या प्रकरणात तक्रारही दाखल करण्यात आली.

मॉर्फ फोटोतील ती तरुणी गिरीश महाजन यांच्या मित्राची मुलगी, अखेर तक्रार पोलिसांकडून..
Girish Mahajan
| Updated on: Jun 20, 2026 | 11:36 AM
Share

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाराज एका तरुणीसोबतच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर टीका केली जात आहे. मोठी खळबळ उडाली. गिरीश महाजन यांच्यासोबतची ही तरुणी नक्की कोण असा प्रश्न सर्वांना पडला. या फोटोबाबत विविध दावे केले जात आहेत. भाजपाचे संकट मोचक मंत्रीच संकटात सापडले. फोटोशॉपच्या मदतीने गिरीश महाजन यांच्या मित्राच्या मुलीसोबतचा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. सायबर सेलकडून गुन्हाही दाखल करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यासोबत दिसणारी ही तरुणी महाजनांच्या मित्राची मुलगी आहे. मात्र, हा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला. हा फोटो सोशल मीडियावर काढला, जावा असेही तक्रारीत म्हटले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या बदनामी प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मंत्री गिरीश महाजन यांचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  जलसंपदा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांकडून तक्रार दाखल करण्यात आली. इन्स्टाग्राम व एक्स पोस्ट वरून मॉर्फ केलेले फोटो काढून टाकण्याची मागणी.

मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांची जळगावात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिलीये. फोटो व्हायरल करणाऱ्या इंस्टाग्राम, फेसबुक, तसेच फेसबुक पेज धारकांची सखोल चौकशीची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. भाजपचे पितांबर भावसार तसेच रेखा सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

फोटो व्हायरल करणाऱ्यांची ओळख तसेच तांत्रिक माहिती शोधून काढावी, आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .नेत्यांची अशी बदनामी खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर स्त्री शक्ती काय असते ते दाखवून देऊ, संबंधिताना समोर जाऊन चोप देऊ असे रेखा पाटील यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्या व्हायरल झालेल्या फोटोने मोठी खळबळ उडाली. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त