Malad Murder : मालाड मर्डर केसमध्ये मोठी अपडेट ! ज्या शस्त्राने घेतला प्राध्यापकाचा जीव, तो ‘चिमटा’..

Malad Station Stabbing Case : गेल्या आठवड्यात मालाड स्टेशनमध्ये भयानक ह्तयाकांड घडलं. आरोपी ओंकार शिंदेने प्राध्यापक आलोक यांच्या पोटात शस्त्राने वार केला. त्यामुळे आलोक सिंह यांचा मृत्यू झाला. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Malad Murder : मालाड मर्डर केसमध्ये मोठी अपडेट ! ज्या शस्त्राने घेतला प्राध्यापकाचा जीव, तो चिमटा..
मालाड मर्डर केस
| Updated on: Jan 30, 2026 | 9:14 AM

पश्चिम रेल्वेच्या मालड स्थानकात गेल्या शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. लोकलमध्ये झालेल्या वादानंतर एका तरूणाने प्राध्यापकाच्या पोटात चिमटा खुपसला आणि पळ काढला. यामध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. मालाड स्थानकावर झालेल्या हत्याकांडामुळे अख्खी मुंबई हादरली.अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर एवढ्या भयानक घटनेत, हत्याकांडात होईल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. मालाड मर्ज केसमधीलआरोपील ओंकार शिंद याला पोलिसांनी लागलीच अटक केली. आता याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे प्रोफेसर आलोक सिंग यांच्या हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र बोरिवली जीआरपीने जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती पण शस्त्र सापडले न होते जे आता सापडले आहे. याप्रकरणात आणखी तपास सुरू आहे.

शुल्लक वाद जीवावर बेतला

गेल्या शनिवारी, 24 जानेवारी रोजी संध्याकाळी मालाड स्टेशनमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या आलोक कुमार यांचा सहप्रवाशाने भर स्टेशनवर काटा काढला. मृत आलोक कुमार सिंग आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मुळचं लखनऊचं आहे. मात्र आलोक हे लहानपणापासूनच मुंबईत वाढले, मोठे झाले. मात्र, त्यांचं संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहतं. आलोक कुमार सिंग हे प्राध्यापक होते, मुंबईतल्या एका खासगी कॉलेजमध्ये शिकवायचे.

अखेर ते शस्त्र सापडलं 

शनिवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता म्हणून ते लवकर निघाले आणि घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली. पण ट्रेनला प्रचंड गर्दी होती. आरोपी ओमकार शिंदे हा त्याच ट्रेनमध्ये आलोक यांच्या मागे होता.तेव्हा मालाड येण्यापूर्वी आलोक कुमार सिंग व आरोपी ओमकार यांच्यात थोडा वाद झाला. खाली उतरण्यासाठी ओमकार हा आलोक यांना पुढे ढकलत, मात्र पुढे महिला असल्याने असं करू नकोस, असंआलोक यांनी त्याला सांगितलं. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समजतं. याच वादामुळे रागाच्या भरात धुमसत असलेल्याआरोपी शिंदेने आलोक सिंग यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून पळ काढला. यामध्ये प्राध्यापक आलोक गंभीर जखमी झाले. स्टेशनवरच्या इतर लोकांनी, काही प्रवाशांनी त्यांना खाली बसवलं, पोलिसांना कळवलं. त्यानतंर आलोक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

आता याप्रकरणातील हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र बोरिवली जीआरपीने जप्त केले आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली होती पण शस्त्र सापडले न होते जे आता सापडले आहे. पुढील तपास सुरू आहे.