
2008 साली मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासा झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली असून तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे. या खटल्यातील सर्व (7) आरोपींची NIA विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांअभावी या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच या बॉम्बस्फोटात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून 2 लाख तर जे जखमी झाले त्यांना 50 हाडर रुपये देण्यात यावेत असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
एक हजारपेक्षा अधिक पानांचे हे निकालपत्र असून न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून या निकालाचे वाचन करण्यात आले.
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी अशा सात जणांवर आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती, मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आमचा पुनर्जन्म झाला, समीर कुलकर्णींना अश्रू अनावर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी समीर कुलकर्णी हे देखील आरोपी आहोत. बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केली, असा आरोप त्यांच्यावर होता. मात्र त्यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कोर्टाचा निकाला ऐकल्यावर समीर कुलकर्णी यांच्या अश्रूचा बांध फुटला. 17 वर्षं आम्ही पिडीत होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोर्टाचीे निरीक्षणं काय ?