एटीएसने प्रचंड टॉर्चर केले, संघ अन् योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायला लावले… लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित यांचा कोर्टात जबाब

malegaon bomb blast case: मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पुरोहित याने 23 पानी लेखी जबाब सादर केला आहे. त्यात एटीएसने राजकिय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा आरोप केला आहे. सुधाकर चतुर्वेदी हा आर्मीचा खबरी असूनही त्याच्या माध्यमातून आपल्याला एनआयएने त्यात गोवल्याचा पुरोहित याचा दावा आहे.

एटीएसने प्रचंड टॉर्चर केले, संघ अन् योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायला लावले... लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित यांचा कोर्टात जबाब
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 9:27 AM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने त्यांचे वकील विरल बाबर यांच्यामार्फत विशेष एनआयए न्यायालयात लेखी जबाब सादर केला आहे. त्यात अनेक गंभीर आरोप मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांवर केले आहेत. एसटीने आपल्याला प्रचंड टार्चर केल्याचा दावा केला आहे. एसटीएसच्या अत्याचारामुळे माझा उजवा गुडघा मोडल्याचा दावा पुरोहित याने केला आहे. एटीएस अधिकारी त्याची बेकायदेशीरपणे चौकशी करत होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्याकडून हिंदू दहशतवाद शब्द

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने दावा केला की, ऑगस्ट २००८ मध्ये, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिना आधी, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार) यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेत केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत, तर हिंदू दहशतवादीही आहेत, असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेचच २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्दैवी घटना घडली.

दहशतवादी कृत्यांना पाठबळ

दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता मुपल्ला लक्ष्मणा राव उर्फ डॉ. गणपतीच्या भेटीतून महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती दिली होती. नेपाळमधून शस्त्रे, ड्रग्ज यांचा पुरवठा बंद झाल्यानंतर दंडकारण्यातून नक्षलवाद्यांना पुरवठा सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 2006-07 मध्ये डॉ. झाकिर नाईकने ईस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिले जात असल्याचाही अहवाल दिल्याचा पुरोहितांचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा

खबरीच्या माध्यमातून गोवले

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पुरोहित याने 23 पानी लेखी जबाब सादर केला आहे. त्यात एटीएसने राजकिय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा आरोप केला आहे. सुधाकर चतुर्वेदी हा आर्मीचा खबरी असूनही त्याच्या माध्यमातून आपल्याला एनआयएने त्यात गोवल्याचा पुरोहित याचा दावा आहे.

सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.