आमदाराला अश्लील मेसेज, हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, ती भासवून त्याचे कारनामे; कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

Kolhapur Crime: अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला चंदगड येथून अटक करण्यात आली आहे. शिवाजीराव पाटील यांना या व्यक्तीने महिलेच्या नावाने अश्लील मेसेज पाठवले होते. तसेच पैशांची मागणी करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

आमदाराला अश्लील मेसेज, हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, ती भासवून त्याचे कारनामे; कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
Kolhapur Honey Trap
| Updated on: Oct 13, 2025 | 6:44 PM

कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला चंदगड येथून अटक करण्यात आली आहे. शिवाजीराव पाटील यांना या व्यक्तीने महिलेच्या नावाने अश्लील मेसेज पाठवले होते. मात्र आमदारांनी त्याचा नंबल ब्लॉक केला होता. त्यानंतर आरोपी व्यक्तीने दुसऱ्या नंबरवरून मेसेज केला. त्यानंतर पाटील यांनी चितळसर मानपाडा पोलीसात तक्रार दिली होती. त्यानंतर आता ठाणे पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या प्रकरणाबाबत माहिती देताना डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले की, आमदार शिवाजीराव पाटील यांनी तक्रारीत एका व्यक्तीने अश्लील मेसेज व पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हा आरोपी विविध मोबाईल नंबर वरून विविध लोकांना महिला असल्याचे भासवून त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा. आपण महिला आहे असं तो बोलायचं आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी करायची अशाप्रकारे आरोपींनी स्ट्रॅटर्जी वापरली होती.

आमदार पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी दोन्ही नंबर ब्लॉक केले आणि वारंवार वेगवेगळ्या नंबर वरून त्यांना मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे

प्राथमिक तवासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि त्याचं बीएससी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पूर्वी तो एका हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करत होता. आता त्याने आणखी कोणाला मेसेज केलेत याबाबत पुढील तपास सुरू आहे. तो महिलांचं नाव वापरून मेसेज करत होता. त्याने एका मुलीच्या आधार कार्डचा फोटो पाठवला होता. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण सामील आहे याचा तपास सुरु आहे.

या प्रकरणात कोण-कोण सामील आहे हे शोधले जात आहे. याला काही राजकीय काही पार्श्वभूमी आहे का? काही कटकारस्थान आहे का? याबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. पाच ते दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. आरोपीचा हा पहिलाच गुन्हा होता सोशल मीडियावरून तो फोटो डाऊनलोड करायचा आणि तो संबंधित व्यक्तींना पाठवायचा. बेरोजगार असल्याने तो असे कृत्य करत असल्याचेही समोर आले आहे.