AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ट्विस्ट; एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी घेतला मोठा निर्णय

पुणे शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट निर्माण झाला आहे. मंगेश चिवटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ट्विस्ट; एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी घेतला मोठा निर्णय
mangesh chivateImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 2:07 PM
Share

राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. यातील पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीत भाजपसहित एकनाथ शिंदे गटाचा उमेदवारही रिंगणात उरतरल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या मतदारसंघात भाजपकडून कौस्तुक गावडे मैदानात उतरले आहेत. तर शिंदे गटाकडून मंगेश चिवटेंनी अर्ज दाखल केला होता. आता या निवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. चिवटे यांच्या निर्णयाने भाजपला दिलासा मिळाला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनेही या मतदारसंघात जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम केलेल्या कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातील उमेदवारीमुळे महायुतीत पेच निर्माण झाला होता. या जागेवर तिन्ही पक्षाने दावा केला होता. परंतु या जागेवरून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतली. त्यानंतर भाजपने या मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली. तर शिंदेंनी या मतदारसंघात मंगेश चिवटे यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु आता या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. यादरम्यान महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे.

मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्याने पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी माघार घेतली आहे. तर शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी देखील माघार घेतली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. तर पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. मंगेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर माघार घेतली. मंगेश चिवटे यांनी महायुतीत बंडखोरी करत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी