AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरण, ..तर अजित पवार राजीनामा देतील, कोकाटे यांचं मोठं वक्तव्य

पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरणावर बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे, जर आरोप सिद्ध झाले तर अजित पवार राजीनामा देतील असं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार कधीही चुकीचं काम करत नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरण, ..तर अजित पवार राजीनामा देतील, कोकाटे यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2025 | 7:31 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, त्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत, मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे, त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला आणि सर्व राष्ट्रवादी पक्षाला विश्वास आहे की अजित पवार हे कधीच चुकीचं काम करणार नाहीत, जर आरोप सिद्ध झाले तर अजित पवार राजीनामा देतील असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे? 

ही गोष्ट खरी आहे की अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यांचा स्वभाव कसा आहे? अजित पवार हे कधीच काही चुकीचं काम करणार नाहीत. त्यामुळे उगचच मीडियानं हे सर्व प्रकरण लावून धरलं आहे, विरोधी पक्षांकडून अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाहीत. हा माझा आत्मविश्वास आहे. माझाच नाही तर सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील आत्मविश्वास आहे असं यावेळी कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे म्हणाले जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, मग अजित पवार राजीनामा का देत नाहीत? याबाबत देखील कोकाटे यांना यावेळी विचारण्यात आलं. यावर बोलताना ते म्हणाले की,  नुसतं आरोप करणं बरोबर नाही, ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजेत ना, आम्ही जाहीरपणे सांगतो जी काही चौकशी आहे ती चौकशी करा आम्ही त्या चौकशीला सामोरं जाऊ, दोषी आढळले तर अजित पवार राजीनामा देतील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

तसेच महायुतीमध्ये युतीसंदर्भात आणखी कोणताही निर्णय झालेला नाहये. युती करायची की नाही हे तेथील स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे, तसेच त्याबाबत तेथील स्थानिक नेतेच निर्णय घेणार आहेत असं ठरलेलं आहे, जर स्थानिक पातळीवर एकमत होत असेल तर स्थानिक नेते आणि आमदारांसोबत चर्चा करून तिथे युतीबाबत निर्णय होऊ शकतो. युतीबाबत आमची चाचपणी सुरू आहे, आम्ही आढावा घेत आहोत, काही ठिकाणी युती होऊ शकते, काही ठिकाणी युती होणार नाही, असंही यावेळी कोकाटे यांनी म्हटलं आहे.

.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...