Manoj Jarange : शरद पवारांना तुम्ही बोलता पण, तुम्ही…; मराठा-कुणबी आरक्षणासाठी जरांगे आक्रमक, भाजप नेत्यांना काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात मराठा-कुणबी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी आता मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. उपोषणाच्या दहाव्या दिवशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी दहाव्या दिवशी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. शरद पवार, काँग्रेसला तुम्ही काय केलं विचारता, पण तुम्ही दिलं ते उडवलं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दहाव्या दिवशी समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी मनोज जरांगे म्हणाले, ‘सरकारनं जाणुनबुजून हालगर्जीपणा चालवला आहे. मराठा समाजाच्या मुळावर यायला लागलं आहे. मुद्दाम हयगय आणि हालगर्जीपणा लावला आहे. मराठा समाजाला संपवण्यासाठी सर्व सुरू आहे. आपण 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. 15 दिवसांचा वेळ दिलेला आहे. सगळ्या मंत्र्यांनी सांगितले होते, तुम्हाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही. सहा महिन्यांत कुठेच काहीही झाले नाही. 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईत जीआर काढला, त्यावेळी लगेच अंमलबजावणी करू असे सांगितले. तर एका महिन्यात कोल्हापूर, सातारा संस्थान जीआर काढू असे सांगितले. पण एका वर्षात काहीच झाले नाही. शिंदे आणि फडणवीसांची टोळी…संभाजीनगरला होती. तेव्हा हे आंदोलन कसं मोडीत काढता येईल, यावर चर्चा झाली. मुंबईत पोलिसांकडून काहीतरी घडवून आणायचं, म्हणजे फडणवीस बदनाम होईल.
‘मराठ्यांचं आंदोलन मोडायला काहीही डोकं लावायला लागलेत. शिंदे आणि फडणवीस दोघांचेही यामध्ये मंत्री आहेत. मुंबईला जाताना काही झालं, तर समजायचं ही माहिती खरी आहे. 12 तारखेला रेंज असेल किंवा नसेल, सगळ्या मराठ्यांनी बैठकीला अंतरवालीत यावे. सांगली, सोलापूर, पुणे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी बैठकीला यावे. मुंबईतल्या मराठ्यांनी देखील अंतरवालीत यावे. घरी बसून बैठक ऐकायची नाही, प्रत्यक्ष सगळ्यांनी अंतरवालीत यायचं. 12 सप्टेंबरला अंतरवालीतील पार्किंग बंद ठेवणार असून एलईडी लावणार आहोत. 12 तारखेला मुंबईचा निर्णय होणार आहे. जर कोणी अडवलं तरी आडवाआडवी केली, तर त्याला महत्त्व द्यायचं नाही. एखाद्या माय माऊलीचे किंवा बांधवांचे रक्त सांडले तर 10 मिनिटांत उभा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
‘बिना रक्त सांडता तेजस्वी इतिहास होत नाही. महाराष्ट्रातला एवढा मोठा मराठा समाज, माज का उतरवत नाही? हा प्रश्न आहे माझा. 12 तारखेला यांचा माज उतरवायचा आहे. राजकीय, व्यापारी लोकांच्या मागे केस लावून उद्ध्वस्त करायला लागलाय. ईडी लावून…मग्रुर शासक परवडणारा नाही. अजित दादांचं काय झालं, कोणालाच माहीत नाही. किती दिवसात रिपोर्ट येणार आहे. फक्त माणसावर माणसं घालायचे.. शरद पवार, कॉग्रेसने काहीच केलं नाही पण तुम्ही दिलं ते पण उडवलं. भाकर दिली पण औषध टाकून दिली. पोरी पोरं रडायला लागलेत. बांधावर बैल, दगड घेऊन जाणारे तुम्ही शांत कसे. सावध व्हा कोणावर हात उचलायचा नाही, असे जरांगे यांनी सांगितले.
