Manoj Jarange : मनोज जरांगे यांना मोठा धक्का, आझाद मैदानात आंदोलनासाठी पुन्हा परवानगी नाकारली, आता पर्याय काय?
मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा झटका बसला आहे. जरांगे याना आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे यांना पुन्हा धक्का बसला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आमरण उपोषणाला पोलिसांनी पुन्हा नकार दिला आहे. जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी पुन्हा फेटाळली आहे. गणेशोत्सवानंतर आझाद मैदान वगळता इतर पर्यायी जागेसाठी नव्याने अर्ज केल्यास त्या वेळच्या परिस्थितीनुसार विचार केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. जरांगे हे मागील 17 दिवसांपासून उपोषण करत आहे. परंतु काही दिवसाआधी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी जरांगे यांनी रितसर आझाद मैदान पोलिसांनी परवानगी मागितली. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. आता दुसऱ्यांना जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या परवानगी मागितली. परंतु दुसऱ्यांदा देखील मराठा आंदोकांच्या पदरी निराशा पडली. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मराठा आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे दक्षिण मुंबईतील सार्वजनिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, दैनंदिन वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता पोलिसांनी पत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे 14 ते 26 सप्टेंबरदरम्यान सुरू असलेला गणेशोत्सव आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. असे कारण पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं, रवी राणांचं आवाहन
आमदार रवी राणा यांना मनोज जरांगे पाटील यांना मोठं आवाहन केलं आहे. रवी राणा यांनी म्हटलं की, ‘ मी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करतो की, राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत असून राज्य सरकार आपल्या सोबत आहे. सरकारमधील मंत्री, आमदार तुमच्या सोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहे. मुंबईत सध्या गणपती बाप्पाचं आगमन झालाय. त्यामुळे मुंबईत येऊन आंदोलन केल्यापेक्षा लोकांना वेठीस धरल्यापेक्षा लोकांना त्रास झाल्यापेक्षा आंदोलन स्थगित केलं पाहिजे, ते आंदोलन नंतर केलं पाहिजे. गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये कोणी जर विघ्न टाकण्याचे काम करत असेल, हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी दहा दिवस थांबलं पाहिजे’.
