आधी विषारी गोळ्या, नंतर गाडीने धडक देण्याचा प्रयत्न…दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंच्या आरोपांमुळे महाराष्ट्र हादरला, नेमका काय होता कट?

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी थेट माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असे म्हटले आहे. त्यांच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

आधी विषारी गोळ्या, नंतर गाडीने धडक देण्याचा प्रयत्न...दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंच्या आरोपांमुळे महाराष्ट्र हादरला, नेमका काय होता कट?
Manoj Jarange
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 07, 2025 | 12:49 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार केल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलिसांकडे केलेल्या तक्रारीने राज्यात खळबळ माजली आहे. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेमकं काय म्हणाले वाचा…

मनोज जरांगे म्हणाले की, आता घडलेला घटनाक्रम सांगतो. शंभर एक जण बीड आणि जालना जिल्ह्यातले सर्व पक्षाचे लोक असलेले होते. त्यामुळे जनतेच्या प्रशासनात खरं काय आहे ते सर्वांना माहिती आहे. बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए आहे. तो या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचे आहे आणि इथून सुरुवात झाली. पहिले त्यांच्याकडून खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचं ठरलं होतं.

पुढे ते मनोज जरांगे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते. तिथे आरोपींची त्यांची भेट झाली. त्याठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला. मुंडे यांचे हे नपूंसक चाळे आहे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवे असे म्हटले.

बीडचा कांचन पाटील नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.