AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: आता सुट्टी नाहीच, मुंबईला धडकणारच, मुहूर्त कोणता? मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

Manoj Jarane on Mumbai Maratha Morcha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता माघार नाही, तर मुंबईला जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळं मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार हे त्यांनी जाहीर केलं आहे.

Manoj Jarange: आता सुट्टी नाहीच, मुंबईला धडकणारच, मुहूर्त कोणता? मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
मनोज जरांगे, मुंबई मराठा आंदोलनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 11:48 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळात बोलणी फिस्कटली. जरांगे आणि सरकार एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे करत आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीतून त्यांनी काल सरकारवर तोफ डागली होती. तर आज त्यांची भाषा सौम्य दिसली. पण त्याचवेळी मुंबईत धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असे त्यांनी सरकारला ठणकावले. त्यामुळे सरकार आणि जरांगेमधील विसंवादाची दरी वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत मराठा मोर्चा धडकणार

मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. आता सुट्टी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचे याचा मुहूर्त ठरणार आहे. त्याची तारीख ठरणार आहे. याविषयीची माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना थोड्यावेळापूर्वी दिली.

शिबिरं नेमकी कशासाठी?

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. समाजाला हे सहन कराव लागेल.आपलं आपल्याला मिळत नाही. सरकार जाणून बुजून हे करणार आहे, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनापुरतं राबवले की आणखी काही उद्देश आहे. किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जणांच्या सल्ल्याने ठेवले ते बघू, असा संशयही त्यांनी या शिबिराबाबत व्यक्त केला.

सरकारच्या शिष्टमंडळावर निशाणा

3 वर्षात मी कुणाचीही वाट बघितली नाही. मी माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या. मुंबईत आम्ही जाणारच. 12 तारखेला जाहीर करणार. सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे. हे त्यांना कळेल. माझं कर्तव्य मि पार पडत आहे. मी लढायचं ठरवलं आहे. त्यांच्याजवळचे 2-3 जण चांगले आहे. यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.

शिंदे-शिरसाट यांच्यावर टीका

आधी चांगली भाषा वापरत होतो.3 वर्ष शिंदेंना चांगला बोललो.हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार. मी पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार असे जरांगे पाटील म्हणाल.

बबन तायवाडे यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींची स्क्रुटनी करण्याची आणि त्या तपासण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना जरांगे यांनी टीका केली. काय तुम्ही नेते,50 टक्क्यांच्या वर गेले 2 टक्के यावर बोला. आपल्याला कसं मिळालं तेही बघावं.तोही कुणबीच आहे त्याला लाज वाटली पाहिजे 50 टक्क्यांच्या वर गेलं त्यावर बोल म्हणावं. 1994 ला दिलेलं बोगस आरक्षण त्यावर पण बोल म्हणावं, असा समाचार घेतला. त्यांनी पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

Follow Us
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट