उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील तडकाफडकी अंतरवालीला पोहोचले, आज पुन्हा मोठी घोषणा करणार? बैठक बोलावली, नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी समोर येत आहे, दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील हे थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत.

दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकाची बैठक बोलावली आहे, ही बैठक झाल्यानंतर ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये सरकारने काढलेल्या जीआर आणि विविध योजनांच्या बाबतीतली माहिती, तसेच आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील हे आपल्या पुढच्या दौऱ्याची घोषणा देखील करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दैरा केला आहे. आता ते मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा पुढील उपचारासाठी रुग्णालयात जाणार आहेत. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. त्यांनी मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. सर्व मराठा बांधवांनी अतंरवाली सराटीमध्ये या असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आंदोलनामुळे आता पुन्हा एकदा सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आंदोलनाची हाक दिल्यानंतर सराकरी पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे.