AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पुन्हा भगवं वादळ? आंदोलनासाठी मनोज जरांगे यांची मोठी फिल्डिंग, म्हणाले,’मुंडक्यावर पाय ठेवून….’

manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आखला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भगवं वादळ? आंदोलनासाठी मनोज जरांगे यांची मोठी फिल्डिंग, म्हणाले,'मुंडक्यावर पाय ठेवून....'
| Updated on: Aug 07, 2026 | 11:55 AM
Share

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्लान केला आहे. मराठा आरक्षणासाठी गरजेच्या नोंदी रद्द करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. खरंतर सरकारकडून पूर्वनियोजित कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भ, मराठवाड्याचाही दौरा करेल, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. जरांगे यांचा 12 ऑगस्टपर्यंत दौरा असणार आहे. या दौऱ्याआधी मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलं. मनोज जरांगे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेटीअर द्यायचं नाही. 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. त्यांना नोंदी रद्द करायच्या आहेत. सरकारने पूर्वनियोजित कट रचला आहे. मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय राहत नाही. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा रद्द करणार होता. परंतु पश्चिम महाष्ट्रातील लोकांनी पक्षाला मोठं केलं आहे’.

‘आता त्यांच्या लेकरा-बाळांसाठी लढावं लागणार आहे. जमिनी कमी होत आहेत. उत्पन्न कमी होऊ लागले आहे. पिकांना भाव नाही. मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. शिक्षण महाग झालं आहे. त्यामुळे शिक्षणात सवलती मिळाल्या पाहिजे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. सर्वांच्या भेटी घेणार आहोत. मी मराठवाडा, विदर्भाचा देखील दौरा करणार आहे. मराठ्यांनी सत्तेवर बसवलं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आरक्षण लागणार नाही का? नेत्यांच्या बंगले बघून पोट भरणार आहे का? भाजप मंत्र्‍याचा बंगला बघून आपलं पोट भरणार आहे का? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केला.

‘गरीब मराठ्यांचं वाटोळे करण्याचं काम सुरू आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीतील नेत्यांचे मुले पैसे देऊन परदेशात शिकतात. परंतु कार्यकर्त्यांची मुले परदेशात शिकू शकत नाही. आमच्या अंगी कार्यकर्ता म्हणून गरीबी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लढत आहे. जातीचे उपकार विसरायचे नाहीत. कार्यकर्ते पक्षाचे उपकार नसताना त्यांच्यासाठी काम करत आहे. मी कितीही वाटोळे करा. मी आरक्षण घेऊनच राहणार आहे. आरक्षण रद्द कसं करतात, तेही बघतो, असे ओपन चॅलेंज मनोज जरांगेंनी दिली.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...