AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पुन्हा सज्ज, आजपासून पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार? नवा प्लान काय?

मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला आहे.

निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पुन्हा सज्ज, आजपासून पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार? नवा प्लान काय?
| Updated on: Aug 07, 2026 | 11:09 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमधून जरांगे रवाना होणार आहेत. 12 ऑगस्टपर्यंत जरांगे पाटलांचा हा नियोजित दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जरांगे पाटील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं आणि निर्णायक आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे. पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. त्यानंतर या चारही लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. मनोज जरांगेंनी काल थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं होतं. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ शिंदे हे डबल गेम खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या टीकेनंतर तातडीने मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असल्याचे समजते. त्यांनी आजपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आखला आहे.

कसा असेल दौरा?

दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटी मधून रवाना

त्यानंतर तुळजापूर मध्ये समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवाद

सायंकाळी तुळजापूर मुक्कामी

8 ऑगस्ट सकाळी 10 वाजता वडाळा उत्तर सोलापूर बैठक दुपारी 3 वाजता माढा सायंकाळी पंढरपूर दर्शन करून मुक्कामी

9 ऑगस्ट सकाळी 10 वाजता सारकोली ता.पंढरपूर बैठक दुपारी 3 वाजता सांगोला सायंकाळी 7 वाजता प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आटपाडी मुक्काम

10 ऑगस्ट सकाळी 10 वाजता कवठे महाकाळ दुपारी 3 वाजता बोरगाव ता वाळवा सायंकाळी 7 वाजता भेटी गाठी घेऊन कडेगाव मुक्काम

11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता मायणी ता. खटाव दुपारी 2 वाजता मसूर ता कराड सायंकाळी कराड मुक्कामी

12 ऑगस्ट सकाळी 10 वाजता पाटण दुपारी 3 वाजता सातारा

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...