AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात.., मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून, त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात.., मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 3:44 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान पहिले पाच दिवस त्यांनी पाण्याचा एक थेंबही न घेता उपोषण केलं, त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये येऊन भेट घेतली, सरकारला त्यांच्या सर्व अटी मान्य आहेत, असं अश्वासन लाड यांनी दिलं. प्रसाद लाड यांच्या अश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिलं, परंतु उपोषण सोडण्यास नकार दिला आहे, आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपला सुरुवात करा, मग उपोषणाचं बघू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ओबीसींच्या नावावर कुणीही राजकारण करू नका असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अक्कलदाढ पडल्यावर पुन्हा उगवत नाही, ती आता म्हतारपणात पडली आहे.  छगन भुजबळ सत्ता असेल तिकडे जातात. त्यांना आता किंमत देण्याची गरज नाही. ओबीसी समाज आता हुशार झाला आहे, त्यांना पण माहिती आहे की कोण काय काय करतं? आणि आपला कसा उपयोग करून घेतात. भुजबळ कधी महविकास आघाडीचे असतात तर कधी महायुतीचे  उतरती कळा लागली ना असंच होतं. त्यांना आता उतरली कळा लागली आहे, असा हल्लाबोल यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस 

दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. पहिले पाच दिवस तर त्यांनी पाणीही न पिता उपोषण केलं, त्यानंतर अखेर सरकारकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली आहेत, मात्र अजूनही त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाहीये.

Follow Us
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...