AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान

मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी कठोर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईतील आझाद मैदानात लढा देणार आहेत.

आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
manoj jarang patil
| Updated on: Aug 05, 2025 | 5:31 PM
Share

मराठा आरक्षण लढ्यातील विजय मिळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईला धडक देण्याची तयारी सुरु केली आहे. या आंदोलनात आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आता आपण मराठा आरक्षण मिळवूनच स्वस्थ बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देणार असल्याचे म्हटले आहे. आज धाराशिव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावेळी आता मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यावरच फेटा खालू असे म्हणत त्यांनी फेटा बांधण्यास नकार दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार आहेत.

महाविकास आघाडी आंदोलनात सक्रीय

मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये दौरा आणि गाठीभेटी घेणे सुरु आहे. यावेळी त्यांच्या मराठा आरक्षण लढ्याच आपण सक्रीय सहभाग घेणार असल्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं. संपूर्ण महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल असेही उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटले आहे.

लिफ्ट अपघातातून बचावले

बीडमध्ये एका रुग्णालयाची लिफ्ट कोसळल्याच्या अपघातातून मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्टमधून खाली उतरत असताना त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली. या अपघातात मनोज जरांगे पाटील यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही.

सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.