भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार? मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला असून, मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे.

मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी आझाद मैदानासोबतच मुंबईच्या रस्त्यांवर देखील मराठा समाजाची ताकद पहायला मिळाली होती. यावेळी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होत आहे.
परंतु ते अंतरवालीमध्ये होईल किंवा मुंबईमध्ये होईल असे दोन पर्याय सध्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक हे मुंबईमधील आझाद मैदानावर पोहोचले आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पहाणी करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन झालं तर स्टेज कुठे असेल, बसण्याची व्यवस्था कशी असेल? याचा आढावा या शिष्टमंडळाकडून घेण्यात आला आहे. यानंतर आता चर्चा करून मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषणाचं स्थळ ठरवणार आहेत.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्येच उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र तरी देखील पर्याय म्हणून आंदोलनासाठी मुंबईचा देखील विचार सुरू आहे, यापूर्वीच त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला होता, मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला असून, मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पहाणी करण्यात आली आहे. गेल्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं, मराठा बांधवांकडून मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य देखील झाल्या होत्या, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील नेमकं आंदोलन कुठे करणार? अंतरवाली सराटी की, मुंबई याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.