AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : दणक्यात कार्यक्रम लावतो, दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या..जरांगे पाटलांनी शाहू महाराजांसमोर दिला शब्द

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शाहू महाराजांसमोर एक महत्वाची घोषणा केली.

Manoj Jarange Patil :  दणक्यात कार्यक्रम लावतो, दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या..जरांगे पाटलांनी शाहू महाराजांसमोर दिला शब्द
Manoj Jarange Patil-chhatrapati shahu maharaj
| Updated on: Jun 15, 2026 | 1:35 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी शाहू महाराज यांना पत्रकारांनी विचारलं की, तुमची जरांगेंबरोबर चर्चा सविस्तरपणे झाली का? तुम्ही जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शाहू महाराजांनी, नाराजी व्यक्त केली नव्हती. आमच्यात समन्वय राहील असं उत्तर दिलं. कोल्हापुर गॅजेटच्या प्रश्नावर शाहू महाराज म्हणाले की, आता जरांगेंनी हा विषय सीरीयसली घेतला आहे. आपण कोल्हापुरकरांनी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी लगेच बोलायला सुरुवात केली. “पश्चिम महाराष्ट्राचा मध्यभाग कुठे येतो ते आम्ही बघणार. दणक्यात कार्यक्रम लावतो. दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गॅझेटची अमलबजावणी केली पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आता सातारा संस्थानसाठी एक महिन्याचा वेळ घेतला आहे. महाराज साहेबांचं बोलणं होईल त्यांच्याशी” असं जरांगे पाटील बोलले.

पश्चिम महाराष्ट्र सधन आहे असं बोलून, बोलून आपल्याला संपवतील

“पश्चिम महाराष्ट्राला झुंजावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं सांगण आहे की, आपल्याला झुंजावं लागेल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी घराबाहेर यावं लागेल. पश्चिम महाराष्ट्र सधन आहे असं बोलून, बोलून आपल्याला संपवतील” असं जरांगे पाटील म्हणाले. “आपल्याकडे सगळं असलं तरी आरक्षणााच आधार घेऊन मुलं उच्चशिक्षणात गेली पाहिजेत. ऊस, फळबागा आहेत म्हणून उच्च शिक्षण घेऊ नये का?” असा सवाल त्यांनी केला.

वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही

“आज सगळं आहे. पण वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही. तुमच्याकडे भरपूर आहे. आम्ही पाटील लगेच फुगतो. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायला शिकवतातत. आज तुम्ही जितके श्रीमंत आहात, उद्या तुमची मुलं अधिकारी झाली तर अजून श्रीमंत व्हालं” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

तेव्हा एकही मराठा घरात नको

“आपल्याकडे भरपूर आहे. पण आरक्षण पदरात पाडून घेणं गरजेच आहे. आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस आणण्यासाठी आपण खस्ता खाऊ. आपल्याला घर सोडावं लागेल. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करुन ठेवला आहे. आपल्याला आळशी राहून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या मध्यभागी कार्यक्रम होईल, तेव्हा एकही मराठा घरात नाही राहिला पाहिजे” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी