Manoj jarange patil : फडणवीस का बावनकुळेच्या माध्यमातून मूळावर उठलेत? मनोज जरांगे पाटील
Manoj jarange patil :'तुम्ही खडबडून जागे झाला नाहीत, तर तुमच्यात मराठ्याच रक्तच खेळत नाही. उघड, उघड अन्याय केलाय त्यांनी' असं मनोज जरांगे पाटील बोलले. दोन लाख 60 हजार प्रमाणपत्र दिलेत, 219 फक्त अवैध ठरलेत असं सरकारकडून सांगण्यात आलं.

“मी झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षातल्या मराठ्यांच्या लेकी-बाळींच वाटोळ करायला लागलेकत.मी ते पत्र सुद्धा आणलय बोडकेचं. काय वॅलिडिटी आहे. सख्ख्या-चुलत भावाचं प्रमाणपत्र रद्द केलं. का फडणवीस बावनकुळेच्या माध्यमातून मूळावर उठलेत” असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे यांचं पत्र आहे हे. का राग येत नाही मराठ्यांना. जात पडताळणी समितीचा निर्णय आहे हा.कसं रद्द होतं दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र. मी मीडियाशी कधी खोटं बोललो नाही. हे बावनकुळेंच पत्र आहे, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून फडणवीस साहेब काय चूक बोलतोय मी असं मनोज जरांगे पाटील बोलले.
“मी वर्षभरात कधीही फडणीस आणि शिंदे साहेबांवर टीका केली नाही. मला वाटलेलं गरीबाचं कल्याण होईल. मी राजकीय ढवळाढवळ केली नाही. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील मध्ये पडले. मी एका शब्दाने दुखावलं नाही. कारण मला गरीबाचं कल्याण करायचं होतं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
मी एका शब्दाने दुखावलं नाही
“मी वर्षभरात कधीही फडणीस आणि शिंदे साहेबांवर टीका केली नाही. मला वाटलेलं गरीबाचं कल्याण होईल. मी राजकीय ढवळाढवळ केली नाही. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील मध्ये पडले. मी एका शब्दाने दुखावलं नाही. कारण मला गरीबाचं कल्याण करायचं होतं” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “यांच्या डोक्यात वेगळं चाललं आहे. जरांगे पाटील पक्क आरक्षण द्यायला लागलाय. म्हणून मग गैरसमज पसरवा मराठ्यात. आरक्षणाच्या ओरिजनल नोंदी कशा रद्द होतील. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. मराठ्यांना सांगतो एक व्हा, राजकारण नंतर करु” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
मग मीडिया ट्रायल का केली?
‘तुम्ही खडबडून जागे झाला नाहीत, तर तुमच्यात मराठ्याच रक्तच खेळत नाही. उघड, उघड अन्याय केलाय त्यांनी’ असं मनोज जरांगे पाटील बोलले. दोन लाख 60 हजार प्रमाणपत्र दिलेत, 219 फक्त अवैध ठरलेत असं सरकारकडून सांगण्यात आलं. “मग मीडिया ट्रायल का केली? गैरसमज पसरवण्यासाठी सांगितलना प्रमाणपत्र देत नाहीयत” असं जरांगे पाटील बोलले. “सरकारला मोडी लिपी अभ्यासक सापडत नाहीत अशी सध्याचाी पोजिशन आहे. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने होतं. शेवटचा डाव होता हा फडणवीस साहेबांचा. गैरसमज पसरवून मराठ्यांमध्ये फूट पाडता येतेय का?” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मला अटक करायला ये मग बघतो
“ओबीसींच प्रमाणपत्र रद्द करा अशी आमची मागणी नाही. बावनकुळे फडणवीसांना बदनाम करतायत का? अशी चर्चा आहे. शिंदे साहेंबाचा,भाजप नेत्यांचे फोन येतात. पण मी कोणाचा फोन घेत नाही. फडणवीसांनी सगळे डाव करुन पाहिले आता शेवटचा डावा हल्ला करायचा किंवा अटक करायचा असू शकतो” असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मला अटक करायला ये मग बघतो असा इशारा जरांगेंनी दिला.