AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजाभवानीच्या दरबारातून सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे… मनोज जरांगे पाटील यांचा दावा

मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरातून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवरून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. काही प्रमाणपत्रांच्या रद्दबातल प्रकरणात सरकारने सांकेतिक भाषेत आदेश दिल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला.

तुळजाभवानीच्या दरबारातून सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे... मनोज जरांगे पाटील यांचा दावा
manoj jarangeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 11:36 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील निर्णयाक आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी समाजातील लोकांशी बोलून त्यांना भूमिका पटवून देण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज धारावीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तुळजाभवानीच्या दरबारात सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हे धाराशिवला तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरात कुणबी प्रमाणपत्रांशी संबंधित कागदपत्रे दाखवत मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला. मराठा समाजावर अन्याय करू नका म्हणत जरांगे पाटलांनी तुळजाभवानीला साकडे घातले.

मग प्रकार कशामुळे झाला?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणतात आमची काही चूक नाही, गैरसमज झाला. मग हा प्रकार नेमका कशामुळे? असा सवाल जरांगे पाटलांनी केला. वर्षा बोडके यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द होते. मात्र त्यांच्या भावाचे प्रमाणपत्र वैध ठरते. हे असं कसं होऊ शकतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुळजाभवानीच्या दरबारातून सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे, असंही ते म्हणाले.

बावनकुळेंची सांकेतिक भाषा

ज्योती दहीहंडे यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश आहे. मात्र पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला. प्रमाणपत्रावर लिहिलेल्या ‘पैसे द्या’ या शब्दांचा अर्थ काय? असा गंभीर सवालही त्यांनी केला. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषेत लिहून पाच दिवसांत प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

धनगरांसोबतही असेच वागले

धनगर समाजासह अनेक समाजांच्या बाबतीत सरकार असंच वागलं, असा आरोपही त्यांनी केला. तुळजाभवानीच्या साक्षीने जरांगे पाटलांनी पुरावे दाखवले. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सवालही केले. त्यानंतर तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यावर मनोज जरंगे पाटील यांनी आदिवासी बांधवांशी संवादही साधला.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?