AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लोहा गरम असेल तर हातोडा मारा”; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले. आता मनोज जरांगे पाटील यांनी लोहा गरम असेल तर हातोडा मारा, असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

लोहा गरम असेल तर हातोडा मारा; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन
manoj jarange patil
| Updated on: Jul 28, 2024 | 4:16 PM
Share

Manoj Jarange patil On Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले. आता मनोज जरांगे पाटील यांनी लोहा गरम असेल तर हातोडा मारा, असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

कोणाला पाडायचं याचा निर्णय उद्या घेणार

“मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता ते उपचार थांबवून आंतरवली सराटीमध्ये परत जाणार आहेत. मी सुट्टी घेऊन अंतरवालीकडे निघत आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्या राज्यातील समाज एकत्र आल्यानंतर बैठकीबद्दल ठरवू. कोणाला पाडायचं याचा निर्णय उद्या 29 जुलैला घेऊ”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

“EWS आणि SEBC सुरू ठेवा. सरकारला जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे करावे. सरकारने मुलांशी जीवघेणे खेळ करु नये. सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही ही चांगली गोष्ट आहे. गर्व हा कधीही संपतो. गर्वाला कधीही वाढ नसते. सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे. मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून इकडे बोंबलत बसायचं. करायचं तर स्पष्ट करायला शिका. निकष न लावता स्पष्ट द्यायचं शिका”, असेही जरांगे पाटील म्हणाले.

“विधानसभेत यांना पाडायचे म्हणजे पाडायचे”

शरद पवार काय सांगतात त्यापेक्षा माझे मन आणि माझी नियत काय सांगते हे महत्त्वाचे आहे. माझी प्रामाणिक भावना आहे की इतरांना ही आरक्षण मिळायला हवे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, परिणाम काहीही झाले तर चालेल. विधानसभेत यांना पाडायचे म्हणजे पाडायचे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे नेट बंद आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी इंटरनेटचे कारण पुढे केले. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समीकरण जुळवावे लागणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.