AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दर तासाला दोघांना डेंग्यूची लागण, सर्वाधिक रुग्ण ‘या’ राज्यात; गंभीर रोगाचे महाराष्ट्रात रुग्ण किती ?

महाराष्ट्र राज्यात सध्या डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. मात्र यामुळे राज्यातील डेंग्यूचा प्रसारही वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यात दररोज, दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात दर तासाला दोघांना डेंग्यूची लागण, सर्वाधिक रुग्ण 'या' राज्यात; गंभीर रोगाचे महाराष्ट्रात रुग्ण किती ?
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 11, 2023 | 9:29 AM
Share

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : महाराष्ट्र राज्यात सध्या डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. मात्र यामुळे राज्यातील डेंग्यूचा प्रसारही वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यात दररोज, दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे समोर आले आहे. डेंगीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या स्थानी असल्याने चिंता वाढली आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.

त्यानुसार 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण देशभरात डेंग्यूचे 2 लाख 34 हजार 427 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 17 हजार 531 रुग्ण इतकी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असून तेथे 33 हजार 075 रुग्ण आहेत. तर बिहार दुसऱ्या स्थानवर असू त्या राज्यात एकून 19 हजार 672 रुग्णसंख्या असल्याची आकडेवारी आरोग्य विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.

राज्यातील लोकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

मुंबईसह राज्यभराती लोकांच्या आरोग्यावर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरातील रुग्णांच्या तुलनेत सात टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील 4 हजार 300 रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रिपोर्टिंग युनिटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेंग्यूच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव, त्यांचा उपद्रव वाढू नये यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी , असे आवाहनही करण्यात आहे.

चार वर्षांत सर्वाधिक प्रकरणे

गेल्या चार वर्षांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात या वर्षी सर्वाधिक रुग्ण आढळले असल्‍याची माहिती आरोग्‍य विभागाने दिली आहे. 2020 साली रुग्णसंख्या 3 हजार 356 होती तर 2021 साली राज्यातील रुग्णांचा आकडा 12 हजार 720 इतका होता. 2022 साली राज्यात डेंग्यूचे 8 हजार 578 रुग्ण आढळले तर यावर्षी म्हणजेच 2023साली राज्यात आत्तापर्यंत एकूण 17 हजार 541 जणांना या आजाराचा सामना करावा लागला आहे.

कशी घ्याल काळजी ?

डेंग्यू होऊ नये, यासाठी काही नियमांचे आवर्जून पालन करावे

– डेंग्यू, मलेरिया हे रोग प्रामुख्याने डासांमुळे होतात. या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे विशिष्‍ट कालावधीत पाणी बदलत राहा. – पिण्याचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्या. – प्यायचे पाणी नेहमी झाकून ठेवा. – आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच घरात झाडं असतील तर तिथे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या. – साठलेल्या पाण्यात डास अजून वढतात, त्यामुळे नीट स्वच्छता राखा.- ताप, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, त्वचेवर पुरळ येणे, सांधे व स्नायू दुखणे, प्लेटलेट्स कमी होणे अशी डेंग्यूची लक्षणे दिसतात. यापैकी कोणताही त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, त्वरित डॉक्टरांना दाखवा आणि योग्य औषधोपचार घ्या.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.