आरोग्य यंत्रणेची नामी शक्कल, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची थेट कोव्हिड टेस्ट

| Updated on: Apr 17, 2021 | 12:48 PM

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Covid test directly who go out unnecessarily)

आरोग्य यंत्रणेची नामी शक्कल, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची थेट कोव्हिड टेस्ट
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. यासाठी काही जिल्हा प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत अमरावती, कणकवली आणि रत्नागिरीत ही कारवाई केली जात आहे. (Health department to take Covid test directly to those who go out unnecessarily)

कणकवलीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट

राज्यात कोरोना आटोक्यात यावा, यासाठी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे आज कणकवली बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. मात्र तरीदेखील बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जे नागरिक विनाकारण आणि विनामास्क फिरत आहे, त्यांची थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच जो कोणी व्यक्ती संशयित आढळल्यास त्याची तिथेच रॅपिड टेस्ट केली जात आहे. पोलीस, आरोग्य विभाग आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे. या कारवाईतंर्गत आतापर्यंत 20 जणांची टेस्ट करण्यात आली आहे.

रत्नागिरीतही आरोग्य यंत्रणेची नामी शक्कल

तसेच अनावश्यक फिरणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नामी शक्कल लढवली आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांची रत्नागिरीत थेट अॅन्टीजेन टेस्ट केली जात आहे. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात पोलिसांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची धडक कारवाई केली जात आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची थेट रवानगी कोरोना रुग्णालयात केली जात आहे.

अमरावतीत चार ठिकाणी रॅपिड अँटीजन चाचणी 

तर दुसरीकडे अमरावती शहरात काही बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने चार ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रॅपिड अँटिजिन तपासणी केली आहे. यात ज्या नागरिकांची चाचणी निगेटिव्ह आली त्यांना सोडून देण्यात येत आहेत. तर जे नागरिक पॉझिटिव्ह आढळले त्यांना क्वारांटाईन सेंटरमध्ये करून त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारला जात आहे. या कारवाईत आतापर्यंत 100 विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे . (Health department to take Covid test directly to those who go out unnecessarily)

संबंधित बातम्या : 

BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!