मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्धाटनासाठी मुंबईत आहेत. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलतानाही मनोज जरांगे पाटील दिसले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच..
Manoj Jarange Patil
| Updated on: Nov 28, 2025 | 9:52 AM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केली. मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे पण आता आमचे उद्योजक ही झाले पाहिजेत, असे त्यांनी नुकताच म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्धाटन केले जाणार आहे. या उद्योजक कार्यक्रमातून मी त्यांना काही संदेश देणार नाही तर मी घडलेल्या उद्योजकाकडून संदेश घेवून जाणार आहे, असे त्यांनी म्हटले.

मुंबईत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की,  आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत, ज्या कमीटमेंट दिल्या होत्या त्याही पूर्ण होतील. आता निवडणुका सुरू आहेत त्यामुळे वेळ लागला आहे. मी कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही. गाडी अंगावर घालतो अश्या धमक्या देतात. पण मी एकटा नाहीतर महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी जावू द्या माझा मराठा आहे. मी सोडणार नाही

मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त इंट्रेश घेणार नाही. मात्र, ज्यांनी आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही त्यांना आम्ही पाडणारच. त्याशिवाय मराठ्यांची ताकत कळणार नाही, असा इशाराच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मुंबई विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काही महिन्यांपूर्वीच जरांगे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई जाम केले होती.

आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी बसले होते. शेवटी सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि थेट मराठा आरक्षणाबद्दलचा जीआरच काढला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, असे ओबीसी समाजाच्या नेत्यांचे म्हणणे होते. हेच नाही तर याबद्दल लढताना छगन भुजबळ दिसले. सरकारने याबद्दलचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई सोडली होती.