AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर जरांगे पाटलांकडून शेवटचा पत्ता ओपन, काय ठरलं? अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीबाबत 31 तारखेला फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अखेर जरांगे पाटलांकडून शेवटचा पत्ता ओपन, काय ठरलं? अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 29, 2024 | 3:28 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र आता या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. मनोज जरांगे हे देखील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येत्या 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?  

मराठा, दलित व मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी काही धर्मगुरू लांबून येणार आहेत. त्यांना हेलिकॉप्टरची उद्याची परवानगी मिळाली नाही. काल रात्री सगळ्यांचे प्रतिनिधी आले होते, मराठा मुस्लिम आणि दलितांचे प्रतिनिधी दोन दिवसांपासून हेलिकॉप्टरची परवानगी घेत आहेत. त्यांना उद्याची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता फायनल बैठक 31 तारखेला होणार असून,  समाज बांधवांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की, 31 तारखेला इकडे कोणीही येऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चूक केलेली मान्यच करायची नाही ही त्यांची वृत्ती आहे,  त्यांना मला बोलायची गरज काय आहे? आम्ही त्यांना कधी विरोधक शत्रू मानलं? खोट्या केसेस करणं, एसआयटी नेमनं, सग्या सोयऱ्याची अमलबजावणी न करू देणं, आम्ही चूक नाही करत तुम्ही चूक केली. आंदोलन बेदखल करायचं, गुरमीत भाषा करायची, आम्हाला खुन्नस द्यायची त्याचा हिशोब तर लोक करणारच आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. भाजप आणि काँग्रेसच्या ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये खदखद असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.