बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती उत्साहातच होणार, मराठा संघटनांचा आक्रमक पवित्रा

सरकारने कितीही बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्याचा निर्धार सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चानं केला आहे.

बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती उत्साहातच होणार, मराठा संघटनांचा आक्रमक पवित्रा
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:47 PM

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाची शिवजयंती साजरी करण्याबाबत काही नियमावली आखून दिली आहे. पण सरकारने कितीही बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्याचा निर्धार सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. यावेळी मराठा समन्वयकांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. शिवसेनेनं आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत सत्ता स्थापन केली. मग शिवजयंतीला अटीशर्थी का? असा सवाल मराठा संघटनांनी विचारला आहे.(Maratha organizations decide to celebrate Shiva Jayanti with great enthusiasm)

“कोरोना काळात राज्यात अनेक मोठे कार्यक्रम झाले. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली काढली. अशावेळेला शिवजयंतीला अटीशर्थी लावून, मराठा समाजाला एकत्र येण्यापासून रोखण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप” मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरकारने काही अटी घातल्या असल्या तरी शिवजयंती उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्य सरकारची नियमावली

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे.

1. यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी 2. मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये 3. केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये. 4. आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी 5. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे 6. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

मिरवणुकीला परवानगी नाही

शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, कीर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहेत.

संबंधित बातम्या :

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंतीचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा कुठले नियम पाळावे लागतील?

Maratha organizations decide to celebrate Shiva Jayanti with great enthusiasm

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.