त्याला काय XXXX कळतं का? चूक मान्य करावी, अन्यथा…; मनोज जरांगेंची सरकारला वार्निंग
मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

महाराष्ट्रात कुणबी नोंदीवरून राजकारण तापलं आहे. या नोंदीवरून मनोज जरांगे आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आले आहेत. बीडच्या रेखा अंबुरे यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा वादात प्रशासनाने उडी मारली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही, असं सांगण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते. तसेच प्रमाणपत्र रद्द करण्याचेही आदेश दिले नव्हते, असेही प्रशासनाने म्हटलं आहे. बीड प्रशासनाच्या या स्पष्टीकरणावरून मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे यांनी बीड प्रशासनावर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणाले, ‘त्याला काय #XXX$ कळतं का? पेपर फोडून अधिकारी झाला आहे का? कालपासून स्तुती करतोय. तुला अक्कलच येईना. त्यांचा एक दर्जा असतो. तुम्ही बुद्धी वापर करून शिकलेला असता. कोणत्याही मंत्र्याच्या उपकाराने मंत्री झालेला नसता. खरं ते करावं. मराठ्यांच्या भानगडीत पडू नये. प्रवक्ते किंवा वकिली करू नयेत. तुमच्या पोस्ट बघाव्यात. पत्र दिलं नाही. त्यात पत्राच्या आधारे कुणबी पत्र रद्द झालं. कोणत्या मंत्र्याने सांगितलं. बावनकुळे यांनी फोन करून सांगितलं असेल. फडणवीस साहेब खोलात जाऊ नये. मराठ्यांच्याविषयी खोलात जाऊ नये. जड जाईल. आता चूक मान्य करून दुरुस्ती करावी. आम्ही केलेल्या चुका सुधारणार आहोत. आम्हाला काय देणंघेणं आहे’.
मराठा समाजातील तरुणांच्या नोकरीच्या प्रश्नावरही जरांगे यांनी भाष्य केलं. जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांना फक्त प्रचारासाठी ठेवायचं आहे. त्यांना फक्त पत्रके चिकटवण्यास ठेवायचं आहे. सभेसाठी माणसं आणायला. मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. पैसेवाले होऊ द्यायचं नाही. ऊर्जा खाते यांच्याकडे नाही. प्रताप सरनाईक यांनी एसटी महांमडळात काही नोकऱ्या दिल्या. परंतु एमआयडीसमध्ये दिल्या नाहीत. कधी जागा देतात, माहीत नाही. मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. तुमचा माज उतरावयचा आहे. चूक सुधारली तर सोडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला’.