AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ‘मी शब्द देतो की, पोरं….’, मनोज जरांगेंनी दिला मोठा शब्द

Manoj Jarange Patil : "आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायच नाहीय. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण कारायचं आहे, त्यांना आरक्षण द्यायचं नाहीय" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झालीय. त्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलले.

Manoj Jarange Patil : 'मी शब्द देतो की, पोरं....', मनोज जरांगेंनी दिला मोठा शब्द
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2025 | 11:19 AM
Share

“आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारने विशेषकरुन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ती अंमलबजावणी त्यांनी करावी. कारण उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरुवात होते. आज दुसऱ्यादिवसापासूनच ते सुरु झालय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आझाद मैदानातील त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. काही मराठा आंदोलक हे आझाद मैदानानजीक मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. यामुळे मोठी वाहतूककोडीं झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. “दोन दिवसाचा प्रवास दोन दिवसाचा उपोषण त्यामुळे शरीरावर परिणाम होतो. उपोषणास दुसरा दिवस आहे. सरकारला सांगण आहे, मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा. गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या. त्यांचा अपमान करु नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

“तुमचे काही मंत्री म्हणतात एकाच काढून एकाला देऊ शकत नाही. आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही. तुम्ही महाराष्ट्रात गैरसमज पसरवू नका. आमच आहे ते आम्हाला द्या म्हणतोय. त्यांचं काढून घेणं म्हणजे काय, ओबीसींच उदहारणार्थ आरक्षण 32 टक्के आहे, त्याच्यातलं 20 टक्के आम्ही काढून घेतलं, तर काढून घेणं म्हणतात. त्यांना फक्त 10 टक्के ठेवणं काढून घेणं म्हणतात. आम्ही 32 टक्के ओबीसी आरक्षणातलं 20 टक्के मराठ्यांना काढून द्या असं म्हणत नाहीय. आमच्या नोंदी आहेत, त्या ओबीसी आरक्षणातल्या आहेत. आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. मराठा-कुणबी एकच आहोत, हे आमचं म्हणणं आहे. उगाच संभ्रम निर्माण करु नका. राज्य अस्थिर करण्याचं काम होऊ नये ही अपेक्षा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘आम्हाला आरक्षण हवय, राजकारण नकोय, पण मुख्यमंत्र्यांना….’

मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर जरांगे पाटील म्हणाले की, “पोरांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किगंमध्ये लावा” “आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायच नाहीय. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण कारायचं आहे, त्यांना आरक्षण द्यायचं नाहीय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘सगळ्या मुंबईत मराठा पसरलेत’

“ज्या-ज्या स्पॉटवर पोरं असतील, त्यांना विनंती आहे की, तुम्ही संयम ठेवा, आपण वाट बघू. तुम्ही रस्त्यावर गाड्या लावण्याऐवजी पोलिसांनी दिलेल्या मैदानात पार्किंग करा” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. “आता सगळ्या मुंबईत मराठा झालेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का?. ते वाईट करणार नाहीत, माझा शब्द आहे. पोरांना सांगण आहे, अजिबात वाईट करायचं नाही. सगळ्या मुंबईत मराठा पसरलेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....