मराठा आरक्षण : राज्यातल्या वकिलांना दिल्लीतल्या दिग्गजांची साथ मिळणार

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात बुधवारपासून महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. त्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची, तर दुसरी याचिका संजित शुक्ला यांनी दाखल केली. मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलंय ते घटनेनुसार नाही. हे आरक्षण …

मराठा आरक्षण : राज्यातल्या वकिलांना दिल्लीतल्या दिग्गजांची साथ मिळणार

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात बुधवारपासून महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. त्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची, तर दुसरी याचिका संजित शुक्ला यांनी दाखल केली. मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलंय ते घटनेनुसार नाही. हे आरक्षण अतिरिक्त आरक्षण आहे. यामुळे हे आरक्षण रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. तर या प्रकरणात 27 जणांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याचिका दाखल केली होती. ती त्यांनी मागे घेतली आहे.

हायकोर्टात बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य सरकारतर्फे वरिष्ठ वकिलांची मोठी फौज उभी केली आहे. सुरुवातीपासून राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणाची बाजू अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी, माजी अॅडव्होकेट जनरल विजय थोरात, वरिष्ठ वकील अनिल साखरे हे मांडत आहेत. मात्र, त्यात आणखी दिल्लीतील वरिष्ठ वकील येत आहेत. केंद्र सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील परमजीत सिंग पटवालिया, अॅड. निशांत कटनेश्वरकर हे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडणार आहेत.

ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांना मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने विनंती केली होती. पण त्यांचं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वेळापत्रक अगोदरच ठरलेलं असल्यामुळे त्यांनी यासाठी असमर्थता दर्शवली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकुल रोहतगी यांना विनंती केली. मुकुल रोहतगी यांच्यासह इतर दिग्गज वकील असतील.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका

आनंद राव काटे

अखिल भारतीय मराठा महासंघ

विलास सुद्रीक

अशोक पाटील

डॉ कांचन पतीलव

सुभाष बाळू सालेकर

पांडुरंग शेलकर

नितेश नारायण राणे

लक्ष्मण मिसाळ

प्रवीण निकम

विपुल माने

विनोद पोखरकर

दिलीप पाटील

संदीप पोळ

विवेक कुराडे

विनोद साबळे

कृष्णा नाईक

अंकुश कदम

संतोष राईजाधव

बाळासाहेब सराटे

अखिल मराठा फेडरेशन

विक्रम शेळके

विठ्ठल घुमडे

सुरेश आंबोरे

राजेंद्र कोंढारे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *