मराठा आरक्षण : 15 महत्वाचे मुद्दे

मुंबई : आज मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 28 वर्षांपासून ज्या आरक्षणाची मागणी मराठा समाज करत होता, ते मराठा आरक्षण विधेयक अखेर आज मंजूर झालं आहे. हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय सर्व विरोधकांच्या एकमताने संमत झाले. विधानसभेतील सर्व विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणातील 15 महत्वाचे मुद्दे मुद्दा क्र. 1 मराठा समाजाला 16 टक्के …

मराठा आरक्षण : 15 महत्वाचे मुद्दे

मुंबई : आज मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 28 वर्षांपासून ज्या आरक्षणाची मागणी मराठा समाज करत होता, ते मराठा आरक्षण विधेयक अखेर आज मंजूर झालं आहे. हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय सर्व विरोधकांच्या एकमताने संमत झाले. विधानसभेतील सर्व विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणातील 15 महत्वाचे मुद्दे

मुद्दा क्र. 1

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद, विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर, सर्व विरोधकांचा संपूर्ण पाठिंबा

मुद्दा क्र. 2

मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) म्हणून घोषित, विशेष प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण

मुद्दा क्र. 3

मराठा समाज भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(4) व 16(4) मध्ये समाविष्ट केलेले आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार

मुद्दा क्र. 4

मराठ्यांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण

मुद्दा क्र. 5

राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या 16 टक्के आरक्षण

मुद्दा क्र.6

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण

मुद्दा क्र. 7

मराठा समाजाची राज्यातील एकूण लोकसंख्या 32.14 टक्के

मुद्दा क्र. 8

73.86 टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून, मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून मराठ्यांचं मागासपण सिद्ध

मुद्दा क्र. 9

सरकारी, निमसरकारी सेवेत मराठा समाजाला 6.92 टक्के आरक्षण, त्यातही सर्वाधिक नोकऱ्या ‘ड’ वर्गात

मुद्दा क्र. 10

लोकसेवांमधील पदांवर प्रवेश नियुक्त्यांमध्ये जागा

मुद्दा क्र. 11

उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षण मिळणार

मुद्दा क्र. 12

पोलीस दलात मराठ्यांचं प्रमाण 15.92 टक्के

मुद्दा क्र. 13

मराठा समाजातील केवळ 4.30 टक्के उच्चशिक्षित, 35.31 प्राथमिक शिक्षण घेतलेल, तर 13.42 टक्के लोक निरक्षर

मुद्दा क्र. 14

93 टक्के मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी

मुद्दा क्र. 15

मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी 24.02 टक्के

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *