आता सरकारला सुट्टी नाही, एक मिनिटही वेळ देणार नाही, जरांगे पाटील आक्रमक, अंतरवालीमध्ये महत्त्वाची बैठक

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे, येत्या 29 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आता संपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता सरकारला सुट्टी नाही, एक मिनिटही वेळ देणार नाही, जरांगे पाटील आक्रमक, अंतरवालीमध्ये महत्त्वाची बैठक
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 2:16 PM

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे, येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी गोदा पट्ट्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली आहे.  या बैठकीला 130 गावातील मराठा सेवक उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये 29 ऑगस्टच्या आंदोलनाची रूपरेशा ठरवली जाणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.  58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र आणि सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, आणि एक मिनिटाचा ही वेळ देणार नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.  58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र, सातारा,औंध, पुणे, कोल्हापूर आणि बॉम्बे गॅझेट यासह इतर सर्व मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारला त्या दिवशी एक मिनिटाचाही वेळ देणार नाही असेही यावेळी जरागे पाटील म्हणाले आहेत. येत्या 29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज आंतरवालीत येणार असून, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असंही ते म्हणाले.

मराठा समाज समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईमध्ये देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा समाज समन्वयकांकडून आझाद मैदानाची देखील पाहाणी करण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येण्याचा देखील इशारा दिल्यामुळे आता हे आंदोलन नेमकं कुठे होणार? मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईत जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us