‘मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको, जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही’, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. ही बैठक आज तुळजापूरमध्ये पार पडली.

'मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको, जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही', मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
मराठा क्रांती ठोक मोर्चाची पुण्यात चिंतन बैठक

तुळजापूर : ‘मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. ही बैठक आज तुळजापूरमध्ये पार पडली. जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय. (Chintan meeting of Maratha Kranti Thok Morcha in Tuljapur)

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये मोर्च्याचे राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्याया बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय उद्या राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असं आयोजकांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय का झाला?

मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री, आमदार, खासदार असताना मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय का झाला? हा अन्याय का आणि कोणी केला? याचा शोध उद्याच्या राज्यव्यापी बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचे पडसाद पुन्हा राज्यभर पाहायला मिळतील, असंही चिंतन बैठकीचे आयोजक सज्जन साळुंके यांनी म्हटलंय. आता मराठा आरक्षणासाठी मूक मोर्च्याच्या ऐवजी ठोक मोर्चे निघतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत सर्वांनी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक होणार असं पाहायला मिळत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?

मराठा आरक्षण रद्द झाल्यानं शिक्षक भरती लांबणीवर, राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

Chintan meeting of Maratha Kranti Thok Morcha in Tuljapur

Published On - 6:01 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI