Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील नव्या घोषणेच्या तयारीत, 16 मे रोजी नव्या आंदोलनाची तारीख करणार जाहीर
Manoj Jarange Patil : "कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देतं. सरकारलाच काम होऊ द्यायचं नाहीय. सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा आहे.हे डावपेच आपण ओळखले पाहिजेत"

“कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. याला एकजूट हाच पर्याय आहे, तुम्ही या सरकारला किती मायेने आणि पोटतिडकीने सांगितलं ते कधीही आपल्या डोळ्यातले अश्रू पुसणार नाहीत. तुम्हाला आंदोलनाच्या पावित्र्यात यावं लागेल, कट्टरतेने यावं लागेल, सरकारची किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याची दया-माया करून चालणार नाही, तरच न्याय पदरात मिळू शकतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाही? मराठा समाजातील तरुणांच्या तक्रारी वाढत आहेत.आपण 16 मे ला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन आपण उभं करत आहोत, त्याची तारीख मी 16 मे ला सांगणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावर उठला आहे असे बोलले जाते. मला आतलं माहित नाही, पण याला सर्वस्वी जबाबदार सरकार असतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांच्या पोरांचं सिविल खराब होत आहे
“कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देतं. सरकारलाच काम होऊ द्यायचं नाहीय. सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा आहे.हे डावपेच आपण ओळखले पाहिजेत” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पण यामध्ये वाटोळ मराठा समाजाचं होत आहे.मराठ्यांच्या पोरांचं सिविल खराब होत आहे. कर्जबाजारी होत आहे, याला मूळ कारण सरकार आहे” असं ते म्हणाले.
राज्यात खूप मोठं आंदोलन उभं राहणार
“सारथी पासून ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही.कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी सरकार जाणून-बुजून देत नाही. या सगळ्या विषयावरती राज्यात खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे. त्याची तारीख आम्ही 16 मे ला जाहीर करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.