AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: चक्क 220 कोटी रुपये खर्च करून 26 वर्षीय तरुण बनला ‘कुत्रा’? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेमकं सत्य काय?

दररोज इंटरनेटवर विविध व्हिडिओ व्हायरल होतात. यापैकी बरेचसे बनावट असतात. AI युगात, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम ते एक्स  पर्यंतच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेकदा डीपफेक आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ आढळतील.

Video: चक्क 220 कोटी रुपये खर्च करून 26 वर्षीय तरुण बनला 'कुत्रा'? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेमकं सत्य काय?
| Updated on: Aug 09, 2026 | 9:06 AM
Share

दररोज इंटरनेटवर विविध व्हिडिओ व्हायरल होतात. यापैकी बरेचसे बनावट असतात. AI युगात, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम ते एक्स  पर्यंतच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेकदा डीपफेक आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ आढळतील. त्यामुळे, कोणतीही ऑनलाइन व्हिडिओवर पटकन विश्वास ठेवणे जरा अवघड असते. अशातच आता एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एका माणसाने स्वत:ला कुत्र्यांच्या स्वरुपात रुपांतर केले आहे. आता या माणसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण जे व्हिडिओमध्ये दिसत आहे तेच खरे आहे की नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालानुसार, जपानमधील एका तरुणाने कुत्र्यासारखे दिसण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. त्याचा विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 26 वर्षीय करोडपती जासोने कुत्र्यासारखे दिसण्यासाठी अंदाजे 2.2 दशलक्ष रुपये खर्च केले आहेत. पोस्टनुसार, या कुत्र्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या असून, त्याच्या हालचाली आणि रूप पूर्णपणे कुत्र्यासारखे झाले आहे. या दाव्यांना अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जासोने आपले रूप आणि शरीर कुत्र्यासारखे बनवण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. आता यामागचे सत्य काय आहे ते पाहा.

जपानची रहिवासी असलेल्या टोकोला लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल विशेष प्रेम होते. काही काळासाठी प्राण्यांसारखे जीवन अनुभवण्याचे त्याचे स्वप्न होते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने चित्रपट, जाहिराती आणि मनोरंजन क्षेत्रासाठी खास पोशाख तयार करणाऱ्या एका जपानी कंपनीशी संपर्क साधला. टोकोने विशेषतः असा लूक निवडला, ज्यामुळे तो बॉर्डर कोलीसारखी दिसेल. कंपनीने खास त्च्यायासाठी एक पोशाख तयार केला. टोकोसाठी तयार केलेला पोशाख नेहमीच्या पोशाखांपेक्षा खूपच वेगळा होता. तो मानवी शरीर झाकण्यासाठी आणि परिधान करणाऱ्याला दुरून खऱ्या कुत्र्यासारखे दिसण्यासाठी तयार करण्यात आला होता. हा पोशाख तयार करायला अंदाजे 40 दिवस लागले. कंपनीने कुत्र्याची शारीरिक रचना, केस आणि पायांचा आकार यांसारख्या अनेक घटकांचा विचार केला. परिणामी, तो पोशाख घातल्यानंतर टोको अगदी खऱ्या बॉर्डर कोलीसारखा दिसत होता.

व्हायरल झालेल्या दाव्यानुसार, टोकोने कुत्रीमध्ये रूपांतरित होण्यासाठी अंदाजे 220 कोटी खर्च केले. पूर्वीच्या अहवालांनुसार हा आकडा चुकीचा आहे. अहवालात म्हटले आहे की, या विशेष पोशाखावर अंदाजे 20 लाख जपानी येन (JPY) खर्च करण्यात आले. त्यावेळी भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 11 ते 12 लाख रुपये झाली असती. टोकोने त्याचे शरीरात बदल करण्यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करून घेतली नाही.

Follow Us
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी