AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja : ड्रेसिंग रुममधला तो व्हिडीओ व्हायरल, रविंद्र जडेजाने थेट गौतम गंभीरसमोर… नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja Video: सध्या सोशल मीडियावर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रविंद्र जडेजा आणि गौतमी गंभीर एकत्र दिसत आहेत. दरम्यान जडेजाने असं काही केलं की सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Ravindra Jadeja : ड्रेसिंग रुममधला तो व्हिडीओ व्हायरल, रविंद्र जडेजाने थेट गौतम गंभीरसमोर... नेमकं काय घडलं?
गौतम गंभीर आणि रविंद्र जडेजाImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 9:27 AM
Share

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध कोलंबोत सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केला. देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले, तर गुरनूर ब्रारने एकाच षटकात चार षटकार मारत मैदानावर धमाल केली. दरम्यान ड्रेसिंगरूममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की रविंद्र जडेजा प्रशिक्षक गौतम गंभीर यांना काही तरी सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

बॅटिंगला जाण्याआधी जडेजा डगआउटध्ये गंभीरसोबत उभा होता. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना जडेजाने अचानक कुलदीप यादवच्या गोलंदाजीची शैली आणि चेहऱ्यावरील हावभाव नक्कल करून दाखवले. ही मिमिक्री इतकी जिवंत होती की गौतम गंभीर यांना हसू अनावर झाले. या घटनेमुळे मैदानावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

वाचा: एकमेकांच्या गर्लफ्रेंड… अभिजीत दीपकेंवर सीजेपीच्या दोन सदस्यांचा आरोप, अडचणीत वाढ?

साई सुदर्शन दुखापतीमुळे सिरीजमधून बाहेर

दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताची सुरुवात मात्र खराब झाली. यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. राहुल ६७ चेंडूंमध्ये ४० धावा करून बाद झाला, पण पडिक्कलने आपली जागा घट्ट केली. त्याने १६४ चेंडूंमध्ये १४२ धावा काढल्या आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. साई सुदर्शन दुखापतीमुळे सिरीजमधून बाहेर पडला असल्याने आता पडिक्कलची जागा संघात पक्की झाली आहे.

श्रीलंकेच्या गोलंदाजांना धक्का

पडिक्कलनंतर जडेजा मैदानात आला आणि त्याने ६३ धावांची खेळी केली. मात्र ऋषभ पंत आणि ध्रुव जुरैल यांना फार वेळ टिकता आले नाही. दोघेही स्वस्तात बाद झाले. यानंतर गुरनूर ब्रारने कमाल केली. त्याने एकाच षटकात चार षटकार मारत श्रीलंकेच्या गोलंदाजांना धक्का दिला आणि भारताला मजबूत स्थितीत आणले. तिसऱ्या दिवशी टीम इंडिया पुन्हा गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?