AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाचे 8 खासदार PM मोदींना भेटणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाले, थोड्याशा फायद्यासाठी…’

शरद पवार गटाचे 8 खासदार PM मोदींना भेटणार असल्याचे निश्चित झालं आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या बड्या नेत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार गटाचे 8 खासदार PM मोदींना भेटणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाले, थोड्याशा फायद्यासाठी...'
| Updated on: Aug 09, 2026 | 9:17 AM
Share

शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरून मोदींची ही भेट घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी एफसीआरए बिलाला देखील विरोध असल्याची भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. परंतु या भेटीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचा स्वतंत्र पक्ष आहे. भेटीचा प्रश्न हा त्यांचा आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. थोड्याशा फायद्यासाठी सरकारला मदत करू नका, असेही त्यांनी म्हटलं.

नाना पटोले यांनी भंडाऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. नाना पटोले म्हणाले, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. माझं आणि काँग्रेसचं आवाहन आहे की, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून भाजप आणि आरएसएसकडून संविधानिक ढाचाला तोडण्याचं काम करत आहे’.

‘महिला आरक्षणाला पुढे करून या गोष्टी सुरू आहेत. 2023 मध्ये महिला आरक्षणाचं विधेयक पारित झालं. ते 2024 मध्ये लागू का केलं नाही? आता 33 टक्के मंजूर झाल्यानंतर 50 टक्के मंजूर करण्याविषयी बोलत आहेत. त्यावेळी पटलावर का आणलं नाही? आता महिलांना पुढे करायचं आणि संविधानिक व्यवस्था आणि ढाचा उद्ध्वस्त करायचा प्लान भाजप सरकारचा सुरू आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की, थोड्याशा फायद्यासाठी सरकारला मदत करू नका. हे मतदारसंघ पुर्नरचना विधेयक पडलं पाहिजे, असे आवाहन नाना पटोले यांनी केलं.

भाजपचे माजी पदाधिकारी विजय चौधरी यांच्यावरील कारवाईवर पटोले यांनी भाष्य केलं. नाना पटोले म्हणाले,’विजय चौधरींच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. यावर नाना पटोले म्हणाले, अनेक दिवसांपासून हे प्रकरण आहे. अनेक ऑडिओ व्हायरल होत होते. वृत्त वाहिन्यांवरही पाहत होते. आता अंगावर यायला लागल्याने कारवाई सुरू झाली. तो उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख वगैरे होतात. अंगावर आल्याने राजीनामा घेण्यात आला. या मानसिकतेची लोक भाजपमध्ये आहेत. हे आता सिद्ध झालं आहे’.

Follow Us
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...