AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल, पुढचे 15 दिवस… डॉक्टरांचा मोठा सल्ला काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले उपोषण सरकारच्या निर्णयामुळे संपले आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल, पुढचे 15 दिवस... डॉक्टरांचा मोठा सल्ला काय?
| Updated on: Sep 03, 2025 | 10:05 AM
Share

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. अखेर काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगेनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना लगेचच पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. आता डॉक्टरांनी त्यांना पुढील पंधरा दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून परतल्यानंतर रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची संपूर्ण तपासणी केली आहे. दीर्घकाळ उपवास केल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर, रक्तदाब तपासण्यात आले. त्यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या तपासण्याही करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा समाजामध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पण आता त्यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचं आश्वासन यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं.

डॉक्टर काय म्हणाले?

रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर खूप ताण आला आहे. त्यांची ताकद कमी झाली आहे. तसेच त्यांच्या शरीराला लागणारी पोषक तत्त्वेही घटली आहेत. त्यामुळेच, त्यांना पूर्णपणे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन आठवड्यांसाठी कोणताही प्रवास किंवा सार्वजनिक कार्यक्रम करु नका, असा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्यावर उपचार करेल. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते आराम करतील.

याचा सर्वाधिक लाभ गरीब आणि गरजू मराठ्यांना होणार

मराठा आंदोलनाचे नेते असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता ते उपोषण मागे घेतल्यामुळे सरकार आणि मराठा समाज दोघांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. अखेर त्यांचा विजय झाला असून याचा सर्वाधिक लाभ गरीब आणि गरजू मराठ्यांना होणार आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले जात आहे.

Follow Us
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...