Maratha reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? आज पुण्यात होणार मोठी घोषणा

कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे, त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे.

Maratha reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? आज पुण्यात होणार मोठी घोषणा
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 8:47 AM

मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्टपासून ते पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. मराठा बांधवांनी या आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेत आहेत. मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यापूर्वीच ओबीसी नेत्यांकडून हालचालींना वेग आला आहे.

आज पुण्यामध्ये ओबीसी समाजाची निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  पुण्यातील पत्रकार भवन येथे दुपारी दोन वाजता ओबीस बांधवांची ही बैठक पार पडणार आहे.  ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या आगामी संघर्षाची रणनीती, आंदोलनाची रूपरेषा तसेच  पुढील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा, करण्यात येणार  आहे. या बैठकीला  ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे आणि नवनाथ वाघमारे हे मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या ते मराठा बांधवाच्या भेटीगाठी घेत असून, 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे. परंतु त्यानंतर आता दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्या देखील हालचाली वाढल्या आहेत. आज पुण्यामध्ये ओबीसी समाजाची निर्णायक बैठक होणार आहे. आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us