AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य व्हायचंय? मावळ्यांसाठी संभाजीराजेंनी दिली लिंक!

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडले जाण्यासाठी संभाजीराजे यांनी एक लिंक ट्वीट केली आहे.

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य व्हायचंय? मावळ्यांसाठी संभाजीराजेंनी दिली लिंक!
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा
| Updated on: Jun 02, 2021 | 6:49 PM
Share

मुंबई : किल्ले रायकडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) जातीने या तयारीकडे लक्ष देऊन आहेत. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण, मराठा मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी रायगडावर महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडले जाण्यासाठी संभाजीराजे यांनी एक लिंक ट्वीट केली आहे. त्यामाध्यमातून शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडलं जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. (SambhajiRaje Chhatrapati share a link of Shivrajyabhishek Mahotsav Samiti)

“शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी पुढील लिंक वरती आपली संपूर्ण माहिती भरावी”, असं आवाहन संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. संभाजीराजे यांनी दिलेली लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeU9fLmxPm-Hvy_Nvmm3Rg-LXFAIxVPk_V8SYabIhhW_SPpRw/viewform

रायगडाकडे कूच करा – संभाजीराजे

राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

राज्याभिषेक सोहळ्याला गर्दी होणार का?

मराठा आरक्षणाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे संभाजीराजे छत्रपती लोकांशी जोडले गेले आहेत. ही गोष्ट म्हणजे रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. तब्बल 15 वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. या सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी येतात. गेल्यावर्षी हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा या सोहळ्याला गर्दी होण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारला अल्टिमेटम

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला अजून 5 गोष्टी सांगितल्या आहेत. या 5 गोष्टींवर 7 जूनपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही कोरोना वगैरे पाहणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. मी स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचं वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द

SambhajiRaje Chhatrapati share a link of Shivrajyabhishek Mahotsav Samiti

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...