AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaktipeeth Marg : ‘पैसे जास्त झाले असतील तर..’ शक्तीपीठ मार्गाविरोधात सांगलीत भव्य मोर्चा, काँग्रेस-शरद पवार पक्षाचे बडे नेते आले एकत्र

Shaktipeeth Marg : "शक्तीपीठचा घाट या सरकारने घातला. पण निवडणुकीच्या वेळी शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते निवडणुकीसाठी होतं. रत्नागिरी मार्ग आहे. त्या रस्त्यावरून जायला माणसं नाहीत"

Shaktipeeth Marg : 'पैसे जास्त झाले असतील तर..' शक्तीपीठ मार्गाविरोधात सांगलीत भव्य मोर्चा, काँग्रेस-शरद पवार पक्षाचे बडे नेते आले एकत्र
Shaktipeeth Marg
| Updated on: Aug 21, 2026 | 1:59 PM
Share

शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. सांगलीच्या क्रांतीसिंह नाना चौकातून शक्तिपीठ विरोधी समितीच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. विश्रामबाग मधून सुरू झालेल्या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे.विश्रामबाग चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

“शक्तीपीठचा घाट या सरकारने घातला. पण निवडणुकीच्या वेळी शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते निवडणुकीसाठी होतं. रत्नागिरी मार्ग आहे. त्या रस्त्यावरून जायला माणसं नाहीत. पण या शक्तीपीठचा घाट यांनी घातला आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे” असं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.

..तर आम्हाला सुचवा कसे खर्च करायचे

“पैसे जास्त झाले असतील तर 500-500 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना द्यावेत. “1 लाख 10 हजार कोटी पैसे खर्च करण्याचा प्रश्न तुमच्या समोर असेल तर आम्हाला सुचवा कसे खर्च करायचे. कुणाला तर कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून हा रस्त्याचा घाट सुरू आहे. कोण सांगायला आलं जमीन दे तर ओळखायचं, त्याला दहा टक्के कमिशन मिळणार आहे” असा दावा सतेज पाटील यांनी केला.

लोक रस्त्यावर उतरू लागलेत

“सर्व स्तरातून शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असून शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे शक्तीपीठला समर्थन कोणाचे नाही. लवकरात लवकर शक्तीपीठ रद्द करावा यासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. शक्तीपीठ रद्द नाही झाला तर असेच आंदोलन सुरू राहील” असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे

Follow Us
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत